Friday, February 14, 2025
Homeमहाराष्ट्रभयानक क्रूरता, पत्नीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, श्रद्धा वाकर सारखं...

भयानक क्रूरता, पत्नीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, श्रद्धा वाकर सारखं हत्याकांड

दिल्लीतील श्रद्धा वाकर मर्डर केसने सगळ्या देशाला हादरवून सोडलं होतं. आता असच एक प्रकरण तेलंगणच्या हैदराबादमध्ये घडलं आहे. एका माजी सैनिकाने पत्नीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे प्रेशन कुकरमध्ये शिजवले. पोलिसांनी ही माहिती दिलीय. आरोपी सध्या सुरक्षा रक्षकाचं काम करायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षाच्या महिलेच्या हत्येच्या संशयावरुन पोलिसांनी पतीला अटक केली होती. त्याने चौकशीत धक्कादायक दावे केले. ते ऐकून पोलीसही हैराण आहेत. त्याने सांगितलं, की पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले नंतर नदीत फेकून दिले.

 

पत्नीशी भांडण झाल्यानंतर आरोपीने असं कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. अधिक चौकशीनंतर संपूर्ण घटनेची माहिती समोर येईल. मृत महिला आठवड्याभरापूर्वी बेपत्ता झाली होती. तिच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच नाव गुरु मुर्ती आहे. सध्या तो कंचनबाग येथे सुरक्षा गार्डची नोकरी करतोय. याआधी तो सैन्यात होता. तो सेवानिवृत्त झालाय. गुरु मुर्तीच लग्न 13 वर्षांपूर्वी वेंकट माधवी बरोबर झालं. दोघांना दोन मुलं आहेत.

 

शरीराचे 35 तुकडे केले

 

दिल्लीत राहणाऱ्या श्रद्धा वाकरची 18 मे 2022 मध्ये दिल्लीत निर्घृण हत्या झाली होती. तिचा 28 वर्षीय प्रियकर लिव इन पार्टनर आफताब अमीन पूनावालाने गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर ओळख लपवण्यासाठी तिचा चेहरा जाळला. शरीराचे 35 तुकडे केले. पूनावालाला 12 नोव्हेंबर 2022 रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. श्रद्धाच्या वडिलांन आफताबसाठी फाशीच्या शिक्षेची मागणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -