Thursday, January 30, 2025
Homeदेश विदेश4 वर्षापूर्वी मेलेल्या मुलाचा आत्मा घ्यायला 24 लोक रुग्णालयात आले, नंतर काय...

4 वर्षापूर्वी मेलेल्या मुलाचा आत्मा घ्यायला 24 लोक रुग्णालयात आले, नंतर काय घडलं? 

राजस्थानच्या कोटा शहरातील अंधश्रद्धेचा भयंकर प्रकार समोर आला आहे. लोक किती अंधश्रद्धाळू असू शकतात त्याचंच हे उदाहरण आहे. इथल्या एमबीएस रुग्णालयात चार वर्षापूर्वी उपचार सुरू असताना एका मुलाचा मृत्यू झाला होता. आज सकाळी त्याच्या कुटुंबातील लोक त्याचा आत्मा घेऊन जाण्यासाठी रुग्णालयात आले होते. बुंदी येथून तब्बल 24 लोक आले होते. मात्र, रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत सोडलं नाही. पण या विचित्र प्रकाराने सर्वांचंच डोकं सुन्न झालं आहे. या लोकांना म्हणावं तरी काय? असा सवाल प्रत्येकाला पडला आहे.

मृत मुलाचं नाव मनराज आहे. तो बूंदी जिल्ह्यातील डापटा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील झाडगंजचा रहिवाशी आहे. चार वर्षापूर्वी त्याला एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला होता. आता चार वर्षानंतर त्याचे कुटुंबीय आज सकाळी 8 वाजता रुग्णालयात आले. त्यांच्या सोबत 24 लोक होते.

त्यात महिलांची संख्या अधिक होती. एवढा मोठा जत्था एकत्र आल्याचं पाहून रुग्णालयातील सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी त्यांना हटकले. त्यावेळी आम्ही मुलाचा आत्मा घेऊन जायला आलो आहोत, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हुसकावून लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे या लोकांनी रुग्णालयात जाऊ देत नाही म्हणून रुग्णालयाच्या बाहेर प्रचंड गोंधळ घातला. पोलिसांना शिव्याशाप दिले. त्यामुळे पोलिसांनी अखेर यातील तिघांना अटक केली असून त्यांची थेट तुरुंगात रवानगी केली आहे.

गेटवरच गोंधळ

एमबीएस रुग्णालयाच्या गेटवर पूजा केल्यानंतर एक महिला विचित्रपणे वागायला लागली. तिच्या अंगात आल्याने ती गेटवरच घुमायला लागली. तिच्या अंगात देवी-देवता आल्याचं या महिलेच्या नातेवाईकांनी सांगितलं. आमच्या मुलाचा आत्मा याच रुग्णालयात आहे. आम्हाला तंत्र साधना करून त्याचा आत्मा सोबत न्यायचा आहे, असं सांगत या लोकांनी रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना हुसकावून लावल्याने त्यांनी अधिकच जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या लोकांनी गेटवर जोरदार गोंधळ केल्याने पोलिसांना त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी लागली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -