US Iran Peace Deal: गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण जगाला आर्थिक संकटात आणणारे अमेरिका-इराण युद्ध अखेर संपुष्टात येण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबत शांतता करार झाल्याची घोषणा केली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात 10 कलमी शांतता करार झाला आहे. या कराराच्या मसुद्द्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कराराकडे पाहिल्यास अमेरिका (America) आणि इराण (Iran) दोन्ही देशांनी परस्परांकडून प्रमुख मागण्या मान्य करवून घेतल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या शांतता कराराच्या घोषणेला इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलनं दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता हे युद्ध थांबून आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचा (Crude Oil) पुरवठा सुरळीत होण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. हा शांतता करार अंतिम होताच आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कोसळले आहेत.
इचलकरंजी : वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी तिघांना बेड्या
इचलकरंजी : लग्राचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
इराणकडून परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे या करारावर सही करणार आहेत. इराणच्या संसदेचे अध्यक्ष बाघेर गालीबाफही जिनिव्हाला जाणार आहेत. अमेरिकेकडून उपाध्यक्ष जे.डी.व्हान्स करारावर सही करतील. 19 जूनला दोन्ही देशांत जिनिव्हामध्ये होणार शांती करार
US Iran Peace Deal: कसा आहे शांती करार?
* लेबनॉनसह सर्व आघाड्यांवर कायमची शस्त्रसंधी
* इराण अण्वस्त्रनिर्मिती करणार नाही
* होर्मुजमध्ये इराणला हवी तशी व्यवस्था असेल
* अमेरिका होर्मुजमधली नाकेबंदी 30 दिवसांत उठवेल
* इराणी भूमीतलं सैन्य अमेरिका माघारी बोलावेल
* इराणच्या फेर उभारणीसाठी अमेरिका 300 अब्ज डॉलर्स देईल
* इराणच्या तेल आणि इंधनावरचे निर्बंध हटवले जातील
* अमेरिका इराणच्या अंतर्गत बाबीत ढवळाढवळ करणार नाही
* अमेरिका आखातात लष्कर वाढवणार नाही
* अमेरिका इराणवर नवे निर्बंध लादणार नाही
US Israel Vs Iran War: 108 दिवसांत काय काय झालं?
28 फेब्रुवारी
अमेरिका-इस्रायलचा इराणवर हल्ला
सर्वोच्च नेते अली खामेनेईंचा मृत्यू
2 मार्च
हिजबुल्लाहची युद्धात उडी
5 मार्च
अमेरिकेच्या आखातातील हवाई तळांवर इराणचे प्रतिहल्ले
8 एप्रिल
40 दिवसांनंतर 14 दिवसांची शस्त्रसंधी जाहीर
12 एप्रिल
पाकिस्तानात इराण-अमेरिकेत पहिली शांतता चर्चा निष्फळ
20 एप्रिल
इराण चर्चेस न आल्यानं दुसऱ्या चर्चेचा प्रयत्न निष्फळ
18 मे
इस्रायल आणि लेबनॉनमध्ये तणाव वाढला
6 जून
शस्त्रसंधी तुटली,अमेरिकेनं इराणचे सहा ड्रोन केले निकामी
8 जून
100 दिवसांनंतर युद्ध भडकले,इराणने अमेरिकेचे हेलिकॉप्टर पाडले
9 जून 2026
अमेरिकेकडून इराणवर बॉम्ब वर्षाव
13 जून
दोन्ही देशांत करार अंतिम टप्प्यात,लवकरच सह्या असा ट्रम्पचा दावा
15 जून
शांती करार करण्यावर दोन्ही देशांत सहमती





