कोल्हापुरात ओमायक्रोनचा पहिला संशयित रुग्ण आढळला आहे. ऑस्ट्रेलियावरून आलेल्या ४५ वर्षीय नागरिकाचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. ऑस्ट्रेलियावरून एकूण पाच जण कोल्हापुरात आले असता सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यातील ४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर एकजण पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याचा अहवाल
ओमिक्रॉनच्या चाचणीसाठी पुण्यामध्ये पाठविण्यात आला असून आता सर्वांना त्याची प्रतीक्षा आहे. राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण जसजसे वाढू लागले
आहेत तसतसे कडक निबंध घातले जात आहेत. परदेशातून आलेल्या प्रत्येकाची तपासणी करून भारतात घेतले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा परदेशातून तब्बल ४३२ नागरिक आले असून, त्यातील ३३० जणांना शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे.