विवाह लावून देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या इचलकरंजी येथील टोळक्यास राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विवाह लावून देऊन आर्थिक फसवणूक केल्याबद्दल विक्रम केशव जोगम (वय २४, रा. म्हासुर्लीपैकी जोगमवाडी, ता. राधानगरी) यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या टोळीकडून बरेच फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहेयाबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी विक्रम जोगम याचा विवाह दि. २२/६/२१ रोजी रात्री ९ वाजता म्हासुर्लीपैकी जोगमवाडी येथे वैशाली संजय शिंदे (वय ३८, रा. चांदणी चौक तारदाळ ता. हातकणंगले) यांच्याशी करण्यात आला.यावेळी विवाह ठरविण्यासाठी खुद्द तिचा पती संजय विठ्ठल शिंदे, फिरोज बाबु शेख, समिना फिरोज शेख (रा. शाहुनगर चंदुर सध्या रा. ठाकरे चौक जवाहरनगर इचलकरंजी) हे होते. त्यांनी फिर्यादीकडून एक लाख पाच हजार रुपये घेतले. हा विवाह करताना आधीच्या झालेल्या तीन विवाहाची माहिती लपवून ठेवली. घेतलेली रक्कम आपसात वाटून घेतली.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -