Tuesday, September 16, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : पंचगंगा नदीवरील रेणुका यात्रेला उद्यापासून प्रारंभ

इचलकरंजी : पंचगंगा नदीवरील रेणुका यात्रेला उद्यापासून प्रारंभ

कर्नाटकातील सौंदत्ती रेणुका देवीची यात्रा व दर्शनासाठी रवाना झालेल्या शहरातील यात्रेकरूंच्या बैलगाड्यांचे रविवारी (१६ फेब्रुवारी) सायंकाळी पंचगंगा नदीतीरावर आगमन होत आहे. त्यानंतर सोमवार १७ फेब्रुवारीपासून पंचगंगा नदी काठावर रेणुका देवीची यात्रा भरत आहे.

बुधवारी सौंदत्ती रेणुका देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात्रेसाठी गेलेल्या बैलगाड्या आणि इतर वाहनांचे रविवारी सायंकाळी पंचगंगा नदीकाठावर आगमन होत आहे. या यात्रेकरूंचे आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत करण्यात येणार आहे.

तर सोमवारपासून चार दिवस पंचगंगा नदीवरील रेणुका देवीची यात्रा भरणार आहे. सौंदत्ती रेणुका देवी यात्रेसाठी गेलेल्या बैलगाडी यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरु होवून त्या गाड्या इचलकरंजीत पंचगंगा नदीतीरावर पोहचण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर या बैलगाड्या शहराच्या हद्दीतील पंचगंगा नदी तिरावर मुक्काम करतात. यंदा १७ फेब्रुवारीपासून रेणुका देवीची नदीवरील यात्रा भरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -