Friday, July 4, 2025
Homeमहाराष्ट्रहातात नोटपॅड आणि पेन्सिल… पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला लखपती दीदींसोबत बोर्डरूम शैलीत...

हातात नोटपॅड आणि पेन्सिल… पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला लखपती दीदींसोबत बोर्डरूम शैलीत संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज गुजरातच्या नवसारीत लखपती दीदींना भेटले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी लखपती दीदींशी बोर्ड रूम शैलीत संवाद साधला. नोटपॅड आणि पेन हातात घेऊन पंतप्रधान मोदी चर्चा करत असताना लखपती दीदींचे महत्त्वाचे मुद्दे नोंद करून घेत होते. यावेळी बहुतेक महिलांनी त्यांच्या लखपती दीदी बनण्यामागची प्रेरणा स्पष्ट केली. तुमच्या धोरणांमुळे आणि तुम्ही दिलेल्या प्रेरणेमुळेच त्या आम्ही लखपती दीदी बनू शकलो, असं या महिला पंतप्रधानांना म्हणाल्या.

 

पंतप्रधान काय म्हणाले?

लखपती दीदींना आलेल्या सकारात्मक अनुभवांना ऐकल्यानंतर मोदींनी समाधान व्यक्त केलं. 3 कोटी लखपती दीदींचं उद्दिष्ट लवकरच पार केलं जाऊ शकतं आणि पुढील काळात 5 कोटीपर्यंत आपण पोहोचू शकतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तर, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली काही वर्षांत आम्ही लखपती दीदी कार्यक्रमापेक्षा करोडपती दीदी या कार्यक्रमात भाग घेऊ, असा विश्वास या लखपती दीदींनी यावेळी व्यक्त केला.

 

दीदी बोलत्या झाल्या

एक ड्रोन पायलट म्हणाली की, ती विमान उडवू शकत नाही, पण पंतप्रधान मोदींमुळे मला ड्रोन पायलट होण्याची संधी मिळाली. जेव्हापासून मी ड्रोन उडवायला लागले, तेव्हापासून माझ्या घरात आणि गावात मला “भाभी” म्हणून नाही, तर “पायलट” म्हणून संबोधले जाते, असं या महिलेने सांगितलं. महिलेचा हा किस्सा ऐकून मोदींनी स्मित हास्य केलं

 

व्यवसाय विस्ताराच्या योजनेवर चर्चा करताना, पंतप्रधान मोदींनी लखपती दीदींना त्यांच्या व्यवसायाला ऑनलाइन करण्याचा सल्ला दिला. बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी ऑनलाईन व्यवसाय करणं महत्त्वाचं असल्याचं मोदी म्हणाले. ग्रामीण भागातील महिलाच “विकसित भारत” मार्गावर पुढे जातील, असंही मोदींनी यावेळी स्पष्ट केलं.

 

मोदींकडून प्रशंसा

पंतप्रधान मोदींच्या बाजराला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत, एक महिलेने सांगितले की, गुजरातच्या खाखराला आता राष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली आहे. यावर पंतप्रधान मोदींनी म्हटले की, असे प्रयत्न करा. खाखऱाला आता गुजरातपुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशात प्रसिद्ध होण्यास मदत करत आहोत. एक महिला म्हणाली की, या संवादासाठी आमंत्रण मिळणे तिच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. काही शेजारी तर मजाक करत म्हणाले की, “कृपया, बैठकीत आमच्याबद्दल तक्रार करू नका.”

 

महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवसारी जिल्ह्यातील वांसी बोरसी गावात आयोजित कार्यक्रमालाही मोदींनी संबोधित केलं. गेल्या दशकात, आम्ही महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता दिली आहे आणि महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना थांबवण्यासाठी आम्ही नियम आणि कायद्यांत बदल केले आहेत.माझ्या सरकारने बलात्कारासारख्या जघन्य गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा कायद्यात बदल केला आहे. आमचे सरकार महिलांच्या सन्मान आणि सुखसोयींना सर्वोच्च महत्व देते, असं मोदी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -