उत्तर प्रदेशमधील अयोध्यामधून (Uttarpradesh Honeymoon News) एक धक्कादायक घटना 7 मार्च रोजी घडली होती. हनिमूनदरम्यान नवं दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. प्रदीप आणि शिवानी असं या नवविवाहित जोडप्याचं नाव होतं.
लग्न झाल्यानंतर रात्री प्रदीप आणि शिवानी त्यांच्या खोलीत गेले. सकाळी झाली पण दरवाजा उघडला नसल्याने कुटुंबीयांना भिती वाटली. बाहेरुन दरवाजा ठोठावला, पण तरीही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर कुटुंबीयांना समोर जे दृश्य दिसले त्याने सर्वांनाच धक्का बसला.
वधू शिवानीचा मृतदेह बेडवर पडला होता आणि प्रदीप खोलीतील पंख्यावर लटकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार प्रदीपने आधी पत्नी शिवानीचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:ला गळफास लावून घेतला. सकाळी कुटुंबीयांनी दरावाज तोडून खोलीत प्रवेश केल्यानंतर दोघंही मृतावस्थेत पडले होते. दरवाजा आतून बंद होता, अशा परिस्थितीमध्ये तिसरा कोणी खोलीत असण्याची शक्यता फार कमी आहे. दोघांचेही मोबाईल कॉल डिटेल्स, व्हॉट्सअॅप चॅटिंगची तपासणी केली जात आहे, असं पोलिसांनी सांगितले.
प्रदीपच्या मोबाईलवर कोणीतरी पाठवला होता मेसेज-
प्रदीपच्या मोबाईलवर कोणीतरी मेसेज पाठवला होता, असेही समोर आले आहे. प्रदीपला हा मेसेज नेमका कोणी पाठवला आणि मेसेजमध्ये काय म्हटलं होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्रदीपने शिवानीला सांगितले की, तुझे आधीच प्रेमसंबंध होते, लग्नाच्या रात्री प्रदीप आणि शिवानीमध्ये याच गोष्टीवरुन वाद झाल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व अंदाज वर्तवले जात आहे, अधिकृत माहिती अद्याप पोलिसांनी दिली नाही.
प्रदीप आणि शिवानीचं 7 मार्चला झालं होतं लग्न-
प्रदीप आणि शिवानीचं 7 मार्च रोजी लग्न झालं. सर्वजण खूप आनंदात होतं. लग्नही नीट पार पडलं. नवरा-नवरी दोघंही खूश होते. आपापसात गप्पा मारत होते. दोघांच्या संमतीनेच हे लग्न ठरलं होतं. पण असं नेमकं काय झालं हे समजत नाही असं नातेवाईकांनी म्हटलं आहे. मुलाच्या मोठ्या भावाने सांगितलं की, रविवारी रिसेप्शन होतं. ज्याची जोरदार तयारी सुरू होती. मी कुटुंबातील काही इतर सदस्यांसह आणि नातेवाईकांसोबत भाज्या खरेदी करण्यासाठी गेलो होतो. मी भाज्या खरेदी करत असताना मला घरून फोन आला. कुटुंबातील सदस्यांनी लवकर घरी येण्यास सांगितलं. मी घरी पोहोचलो तेव्हा कुटुंबातील सर्वजण रडत होते.