बँक ऑफ इंडिया (BOI)ने अप्रेंटिसशिप पदासाठी भरती आयोजित केली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये या भरतीसंदर्भात अनेक महत्वाच्या गोष्टी नमूद आहेत
१ मार्च ते २८ मार्चदरम्यान या भरतीच्या प्रक्रियेला सुरु करण्यात येणार आहेत. या भरतीच्या संदर्भात ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज शुल्क भरायचे आहे. अर्ज शुल्क PwBD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ४०० रुपये अर्ज शुल्क करायचे आहे. तसेच यासह उमेदवारांकडून GST आकारण्यात येणार आहे. SC तसेच ST उमेदवारांना ६०० रुपये अर्ज शुल्क करावे लागणार आहे. उमेदवारांकडून GST मध्ये ६०० रुपये आकारण्यात येणार आहे. तसेच सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्ह्णून ८०० रुपये आकारण्यात येणार आहे.
अप्रेन्टिस पदासाठी एकूण ४०० रिक्त आहेत. या भरतीमध्ये काही पात्रता निकष जाहीर करण्यात आले आहेत. या निकषांनुसार, उमेदवारांना पदवीधर असणे आवश्यक आहे. अधिसूचनेमध्ये नमूद असणाऱ्या वयोमर्यादे संदर्भात असणाऱ्या अटींनुसार, किमान २० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे.
पुढील दोन टप्प्यांमध्ये नियुक्तीची प्रक्रिया होणार आहे. ऑनलाईन लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर उमेदवारांना स्थानिक भाषेमध्ये परीक्षा द्यावी लागणार आहे. या भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना स्टायपेंड म्हणून ७,५०० रुपये वेतन मिळणार आहे. तर सरकारकडून 4,500 रुपये वेतन मिळणार आहे. १२,००० रुपये वेतनसह उमेदवारांना दरमाह Pay केले जाईल.
अशा प्रकारे करता येईल अर्ज