ताजी बातमी ऑनलाईन टीम
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांतच जातीचे दाखले देण्यात येणार आहेत. याकरिता दि. 20 ते दि. 31 डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम आयोजित करण्यात आली असल्याचे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गतच अनुसूचित जाती (एस.सी.), अनुसूचित जमाती (एस.टी.), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) व इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) या प्रवर्गांतील जातीचे दाखले देण्यात येणार आहेत.
एक लाख विद्यार्थ्यांना जातीचे दाखले उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग व महसूल विभागामार्फत या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत सध्या प्रवेश असलेल्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दि. 20 ते 31 डिसेंबर या कालावधीत या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.
शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना मिळणार जातीचे दाखले
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -