आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे सोयाबीन, पामतेल आणि सूर्यफूल तेलाच्या दरात डब्यामागे पंचवीस ते पन्नास रुपयांनी घट झाली. मागणी कमी असल्यामुळे साखरेचे दरही क्विंटलमागे पन्नास रुपयांनी कमी झाले.
मात्र, आवक कमी असल्यामुळे हिरव्या वाटाण्याचे दर क्विंटलमागे एक हजार ते पंधराशे रुपयांनी तर हराभराडाळीचे दर २०० रुपयांनी वाढले. तुटवड्यामुळे गोटा खोबरे दरात दहा किलोमागे आणखी दोनशे रुपयांनी वाढ झाली. तर खोबरेल तेल १५ किलोच्या डब्यामागे आणखी पाचशे रुपयांनी तर सर्व प्रकारच्या पोह्यांचे दरही क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढल्याचे सांगण्यात आले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांतून आयात होणाऱ्या वस्तूंवर नव्याने कर लागू केल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला जोरदार धक्के बसत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेवरही याचे दूरगामी परिणाम संभवतात. अनेक जिनसांच्या किमतीत मोठे चढ-उतार होण्याची शक्यता आहे. यामुळे व्यापारी सावधतेने व्यापार करीत आहेत. जागतिक बाजारात सोयाबीन आणि पामोलिन तेलाच्या दरातील तफावत आता कमी होत आहे. मलेशिया, इंडोनेशिया येथे पामतेलाचे उत्पादन वाढत असल्यामुळे दर कमी होत आहेत. तर दुसरीकडे सध्या मागणी कमी आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या दरात टनामागे ७५ ते १०० डॉलर्सनी घसरण झाली.
सोयाबीन तेलाच्या दरात ५० डॉलर्सनी तर सूर्यफूल तेलाच्या दरात २५ डॉलर्सची घसरण झाली. यामुळे वायदे बाजारात खाद्यतेलांच्या दरात मोठी घसरण झाली. येथील बाजारात मागणी कमी आहे. मात्र, आगामी काळात दर आणखी घसरतील या शक्यतेमुळे विक्रीचा दबाव वाढल्यामुळे गेल्या आठवड्यात सोयाबीन, पाम तेलाच्या दरात १५ किलोच्या डब्यामागे पन्नास रुपयांनी घट झाली. सूर्यफूल तेलही पंचवीस रुपयांनी उतरले. शेंगदाणा तेल आणि सरकी तेलाचे दर स्थिर होते. मात्र स्टेरिनची आयात कमी प्रमाणात होत असल्यामुळे वनस्पती तुपाच्या दरात डब्यामागे पंचवीस रुपयांनी वाढ झाली. तर तुटवड्यामुळे खोबरेल तेलाच्या दरात डब्यामागे पाचशे रुपयांनी वाढ झाली. १५ किलोच्या डब्याचा दर ४५०० रुपयांवर पोहोचला असून हा दर विक्रमी मानण्यात येत आहे.
हिरवा वाटाणा महागला, हरभराडाळही तेजीत
आवक कमी प्रमाणात होत असून, मागणी वाढल्यामुळे हरभराडाळीच्या दरात गेल्या आठवड्यातही क्विंटलमतागे दोनशे रुपयांनी वाढ झाली. मात्र, आवक-जावक साधारण असल्यामुळे तुरडाळीसह अन्य डाळी तसेच कडधान्यांचे दर स्थिर होते. आवक कमी प्रमाणात होत असून, मागणी चांगली असल्यामुळे हिरव्या वाटाण्याच्या दरात मात्र क्विंटलमागे एक हजार ते पंधराशे रुपयांनी वाढ झाली. काबुली हरभऱ्याचे दरही तेजीतच होते. गहू, ज्वारी, बाजरी तसेच तांदळाचे दर स्थिर होते.
साखरेच्या दरात घट, गूळ स्थिर
पुढील महिन्सासाठी जाहीर झालेला साखरेचा कोटा अपुरा असल्यामुळे साखरेचे दर आणखी वाढले होते. मात्र, अपेक्षित प्रमाणात मागणी नसल्यामुळे गेल्या आठवड्यात वाढलेले दर पन्नास रुपयांनी कमी झाले आणि पूर्वपदावर आले. दर उतरल्याचे सांगण्यात आले. येथील घाऊक बाजारात एस ३० साखरेचा प्रतिक्विंटलचा दर ४१०० ते ४१५० रुपये होता. उसाच्या कमतरतेमुळे बाजारात गुळाची आवक कमी प्रमाणात होत असून, तेजी कायम आहे. कांदा पोहाही महागला भाताच्या दरवाढीमुळे सर्व प्रकारच्या पोह्याच्या दरात क्विंटलमागे आणखी शंभर रुपयांनी वाढ झाली. भाजके डाळे, मुरमुरा, मका, पोह्याचे दर स्थिर होते. तुटवड्यामुळे गोटा खोबरे दरात दहा किलोमागे आणखी दोनशे रुपयांनी वाढ झाली. यंदा नारळाचे उत्पादन कमी प्रमाणात झाले असून, गोटा खोबऱ्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे खोबऱ्याचे दर सातत्याने वाढत आहेत, साठे अत्यंत कमी असल्यामुळे आगामी काळातदेखील दर आणखी कडाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
येथील घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे –
साखर (प्रति क्विंटल) ४१००-४१५० रु.
खाद्यतेले (१५ किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल २४००-२५००, रिफाईंड तेल २१५०-२७५०, सरकी तेल २०००-२३००, सोयाबीन तेल १९७५-२२००, पामतेल २०००-२१५०, सूर्यफूल रिफाईंड तेल २१००-२२५०, वनस्पती तूप २२५०-२४५०, खोबरेल तेल ४५०० रु.
तांदूळः- गुजरात उकडा ३५००-४०००, मसुरी ३५००-४०००, सोना मसूरी ४५००-५०००, एच.एम.टी. कोलम ५५००-६५००, लचकारी कोलम ६५००-७०००, चिन्नोर ४५००-५०००, ११२१-११०००-११५००, आंबेमोहोर (सुवासिक) ९०००-९५००, बासमती अखंड १२०००-१३०००, बासमती दुबार ९५००-१०००, बासमती तिबार १००००-१०५००, बासमती मोगरा ५५००-६५००, बासमती कणी ४०००-४५००, १५०९-८५००-९५००, इंद्रायणी ५५००-६००० रु.
गहू- लोकवन नं. १४०००-४२००, लोकवन नं. २ ३६००-४०००, नं. ३ ३३००-३६००, सिहोर नं. १ ५७००-६०००, सिहोर नं. ३५०००-५०००, सिहोरी ३८००-४४००, मिलबर ३१०० रु.
ज्वारीः- गावरान नं. १ ५२००-५५००, गावरान नं. २ ४५००-४८००, नं.३ ३५००-३८००, दूरी नं. १ ३६००-४०००, दूरी नं.२ ३२००-३५०० रु
बाजरीः महिको नं. १ ३७००-३८००, महिको नं. २ ३३००-३५००, गावरान ३५००-३६००, हायब्रीड ३२००-३३०० रु. गूळः- गूळ एकस्ट्रा ४२५०-४४००, गूळ नं. १ ४०००-४१५०, गूळ नं. २ ३८००-३९०० गूळ नं. ३ ३६५०-३७५०, बॉक्स पॅकिंग ३९००-५२०० रु.
डाळी:- तूरडाळ १००००-११५००, हरभरा डाळ ६८००-७०००, मूगडाळ ९०००-१०३००, मसूरडाळ ७९००-८०००, मटकी डाळ ७८००-८०००, उडीद डाळ १००००-११३०० रु.
कडधान्येः- हरभरा ६५००-६६००, हुलगा-५५००-५६०० चवळी ७५००-१२०००, मसूर ७१००-७२००, मूग ८५००-९३००, मटकी गावरान ७५००-८०००, मटकी पॉलिश ६०००-६६००, मटकी गुजरात ६०००-६५००, मटकी राजस्थान ६०००-६५००, मटकी सेलम १२५००-१३०००, वाटाणा हिरवा ८५००-९०००, वाटाणा पांढरा ४४००-४५००, काबुली चणा ८०००-१२००० रु.
साबुदाणा :- साबुदाणा नं. १ ५५००, साबुदाणा नं.२/२००, साबुदाणा नं. ३ ४८०० रु.
गोटा खोबरे २२००-२४०० रु.
शेंगदाणा :- जाडा ८२००-८८००, स्पॅनिश-१०७००-१०८००, घुंगरु ९२००-९३०० टीजे ७५०० रु.
धनेः- गावरान ८०००-९०००, इंदूर ११०००-१५००० रु.
पोहे:- मध्य प्रदेश ४९००-५१००, पेण ४६००-४८००, मध्यम पोहा ४८००-५२००, दगडी पोहा ४८००-५२००, पातळ पोहा ५६००-६२००, सुपर पोहा ५३००-५७००, भाजका पोहा ६२५-७२५, मका पोहा ६००-७२५, भाजके डाळे ३३००-३९००, मुरमुरा सुरती (९ किलोस) ५५०-५७०, भडंग ८००-१११०, घोटी ५३०-५४० रु.
रवा, मैदा, आटा (५० किलोचा भाव) आटा १८५०-१९००, रवा १९००-१९५०, मैदा १९५०-२०००,
बेसनः- (५० किलोस) ४०५०-४३५० रु.
मीठ :- मीठ खडे (५० किलोस) २२५, मीठ दळलेले (५० किलोस) २५० रु.
मिरचीः- काश्मीरी ढब्बी २५०००-३००००, व्झाडगी १७०००-२००००, लवंगी तेजा १६०००-१७०००, गुंटूर १५००-१६०००, खुडवा गंटूर ७०००-८०००, खुडवा व्याडगी ८०००-९००० रु.
नारळ :- (शेकड्याचा भाव): नवा पॅकिंग २०००-२१००, मद्रास ४९००-५१००, पालकोल जुना २२००-२३००, सापसोल ४५००-५००० रु.