Friday, June 27, 2025
Homeब्रेकिंगभरदिवसा बंगला फोडला; 6 तोळे दागिने, लाखाची रोकड लंपास

भरदिवसा बंगला फोडला; 6 तोळे दागिने, लाखाची रोकड लंपास

पाचगाव (ता. करवीर) येथील शिक्षक कॉलनीत यास्मिन मेहबूब मकानदार यांचा बंगला फोडून चोरट्यांनी 6 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह कपाटातील एक लाखाची रोकड लंपास केली. सोमवारी भरदुपारी हा प्रकार घडला.

 

मध्यवर्ती व गजबजलेल्या परिसरात हा प्रकार घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

 

सीसीटीव्ही फुटेज व ठसेतज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू आहे. तपासासाठी आणलेले श्वानपथक मकानदार यांच्या बंगल्याच्या पिछाडीस आर.के.नगरकडे जाणार्‍या पायवाटेजवळ घुटमळले. श्रीमती मकानदार केएमटीमध्ये वाहक आहेत. शिक्षक कॉलनीत कंदलगावकडे जाणार्‍या रस्त्यालगत त्यांचा बंगला आहे. सोमवारी (दि. 7) दुपारी बारा वाजता बंगल्याला कुलूप लावून त्या ड्युटीवर गेल्या. रात्री आठ वाजता घरी परतल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूचे खिडकीचे ग्रिल उचकटून बंगल्यात प्रवेश केला. पहिल्या मजल्यावर सर्व खोल्यांमधील साहित्य विस्कटून टाकले. दुसर्‍या मजल्यावरील बेडरूममधील कपाट उचकटले. यातून पर्समधील सोन्याचा हार, सोनसाखळी, अंगठ्या, कानातील फुले, चांदीच्या 15 ते 17 नाण्यांशिवाय 1 लाखाची रोकड लंपास केली आहे. चोरट्यांनी घरातील दागिने, रोकड लंपास केल्याचे निदर्शनास येताच मकानदार यांना धक्का बसला. करवीर पोलिस ठाण्याचे उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी पाहणी केली. संशयित सराईत असावेत, असा त्यांचा संशय आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -