Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरात आलेला दुसरा गवा अठरा तासांनी शिंगणापुरात

कोल्हापुरात आलेला दुसरा गवा अठरा तासांनी शिंगणापुरात

गव्याने  कोल्हापूर शहरातून गुरुवारी पहाटे चांगलाच फेरफटका मारला. गुरुवारी रात्री दोन वाजता पितळी गणपतीजवळून बाहेर पडलेला गवा तब्बल 18 तासांनी शिंगणापूरजवळ पोहोचला. सुमारे दीड वर्षे वयाचा हा लहान गवा शहराबाहेर जावा, यासाठी पहाटेपासून सर्व शासकीय यंत्रणा या गव्याच्या मागावर आहेत. या कालावधीत शहरातील प्रमुख रस्त्यांवरून फिरणार्‍या या गव्याने नागरिकांना ठिकठिकाणी मनसोक्त दर्शन दिले. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास गवा शिंगणापूर येथील चंबुखडी ते बालिंगा (ता. करवीर) या दरम्यान होता.

शुक्रवारपासून शहर आणि परिसरात धुमाकूळ घालणारा एकल गवा  पेठवडगाव, भादोलेमार्गे शिगावच्या दिशेने सांगली जिल्ह्यात गेला. दरम्यान, बुधवारी सकाळी पुन्हा कोल्हापुरात दुसर्‍या गव्याचे दर्शन झाले. शुक्रवारी शहरात घुसलेला हाच गवा परत आला की हा नवा गवा आहे, याबाबत बुधवारी दिवसभर चर्चा सुरू होती. तथापि, गुरुवारी पहाटेपासून शहरात वावरणारा हा गवा नवा असून तो आकाराने लहान असल्याचे स्पष्ट झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -