Saturday, September 30, 2023
Homeकोल्हापूरयुवकाचा खून; कचर्‍यात अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

युवकाचा खून; कचर्‍यात अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

दानोळी (ता.शिरोळ) येथून बुधवारपासून बेपत्ता असलेल्या प्रशांत संजय भिसे (वय २८) या युवकाची मोटरसायकल गुरूवारी विहिरीत आढळून आली होती. त्या पाठोपाठ आज शुक्रवारी कोथळी (ता.शिरोळ) गावच्या हद्दीत भिसे यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री मित्रांच्या झालेल्या वादातून भिसे यांचा खून करून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर एक संशयीत जयसिंगपूर पोलिसात हजर झाला आहे. या घटनामुळे दानोळी परिसरात खळबळ उडाली असून अधिक शोध जयसिंगपूर पोलिस घेत आहेत.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र