Friday, June 27, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : एअरजेट कारखान्यास आग; दीड कोटीचे नुकसान 

इचलकरंजी : एअरजेट कारखान्यास आग; दीड कोटीचे नुकसान 

येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीत असलेल्या एअरजेट कारखान्यास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या दुर्घटनेत कारखान्यातील संपूर्ण मशिनरी व अन्य साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने तब्बल १ कोटी ६२ लाख ७० हजाराचे नुकसान झाले. आहे.

या घटनेची नोंद शहापूर पोलिसात झाली असून पंकजकुमार रामनारायण गट्टाणी (वय ३८ रा. कागवाडे मळा) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पंकजकुमार गट्टाणी यांचा शहापूर परिसरातील खंजिरे औद्योगिक वसाहतीत एअरजेट कारखाना आहे. या कारखान्यात

आगीत भस्मसात झालेला एअरजेट लूम. ५ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. त्यामध्ये २४ लाखाचे दोन एअरजेट मशिन, १६.५० लाखाचे तीन एअरजेट मशिन, ४५ लाखाचे एअरजेट मशिनवरील वायरींग व कॉम्प्रेसर,

१५ लाखाचे डक्टींग, ६ लाखाचे

सिलींग फॉल, ४.५० लाखाचे दोन

बिम, १ लाखाचे बेफ्ट यार्न, ३ लाखाचे हिल्ड वर्पर / ड्रॉपर, ७० हजाराचे क्लॉथ रोल ब २० लाखाचे रिड असे मिळून १ कोटी ६२ लाख ७० हजाराचे नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -