चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला दुखापतीमुळे आयपीएलच्या 18 व्या मोसमातून बाहेर व्हावं लागलं. त्यानंतर टीम मॅनेजमेंटने पुन्हा एकदा अनुभवी महेंद्रसिंह धोनी याच्याकडे कर्णधारपदाची सूत्रं दिली. ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नईने सलग 4 सामने गमावले होते. त्यामुळे धोनी आपल्या नेतृत्वात सीएसकेच्या पराभवाची मालिका खंडीत करत चेन्नईला विजयी ट्रॅकवर आणेल, अशी आशा यलो आर्मीला होती. मात्र सर्व उलटच झालं. चेन्नईला घरच्या मैदानात एमए चिंदबरम स्टेडियममध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. केकेआरने सीएसकेचं वस्त्रहरण केलं. चेन्नईचा हा या मोसमातील एकूण आणि सलग पाचवा पराभव ठरला. चेन्नईचा हा या हंगामातील एकूण सहावा सामना होता.
केकेआरकडून चेन्नईचं वस्त्रहरण
चेन्नईने केकेआरला विजयासाठी 104 धावांचं आव्हान दिलं होतं. केकेआरने हे आव्हान 10.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं आणि चेन्नईचं नाक कापलं. चेन्नईचा हा बॉलबाबत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला. केकेआर टीमने 59 बॉल शेष ठेवत चेन्नईचा धुव्वा उडवला.
चेन्नईला याआधी 5 वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्सने 7 पेक्षा अधिक ओव्हर राखून पराभूत केलं होतं. मुंबईने 2020 साली शारजाहमध्ये चेन्नईचा 42 चेंडूंआधी धुव्वा उडवला होता. तर त्यानंतर पंजाब किंग्सने 2021 साली चेन्नईवर 42 चेंडूआधी मात केली होती. मात्र केकेआरने मुंबई आणि पंजाब या दोन्ही संघांचा रेकॉर्ड ब्रेक केला. केकेआर यासह चेन्नईविरुद्ध वेगवान विजय मिळवणारी टीम ठरली.
केकेआरची रेकॉर्डब्रेक कामगिरी
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचीन रवींद्र, डेव्हॉन कॉनव्हे, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, शिवम दुबे, एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, नूर अहमद, अंशुल कंबोज आणि खलील अहमद.