डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत शहरातील भाग्यरेखा चित्रमंदिर समोरील कामगार चाळ याठिकाणी घरकुले बांधण्याचा निर्णय शुक्रवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत सर्वानुमते झाला. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीसाठी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून दिलेला उपोषणाचा निर्णय मागे घेत असल्याचे सांगितले.
ज्या सफाई कर्मचाऱ्यांची सेवा २५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झालेली आहे, त्यांना मालकी तत्त्वावर मोफत सदनिका देण्याबाबतचा शासन निर्णय झाला आहे.
या अनुषंगाने आम. राहूल आवाडे यांनी इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन आणि कर्मचारी संघटना प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन
अशोक कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिका सभागृहात बैठकीचे आयोजन करण्याच्या सुचना आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांना दिल्या होत्या. त्यानुसार आम. राहूल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त
करण्यात आले होते. बैठकीत योजनेच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा आणि विचारविनिमय करून भाग्यरेखा चित्रमंदिर समोरील कामगार चाळ याठिकाणी घरकुले बांधण्याचा निर्णय सर्वानुमते झाला.
याठिकाणी या योजनेअंतर्गत सद्यःस्थितीत सर्व सोयीसुविधांसह जी+३ मजले अशा स्वरूपाचा परंतु जी+७ मजले गृहीत धरून फौंडेशनची रचना करुन इमारत बांधकामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून पंधरा दिवसांत योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय झाला. बैठकीस सहा. आयुक्त विजय राजापुरे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, रवी रजपुते, माजी नगरसेवक श्रीनिवास कांबळे, कामगार नेते ए. बी. पाटील, शिवाजी जगताप, के. के. कांबळे, सुभाष मालपाणी, अविनाश कांबळे, धनंजय पळसुले, संजय शेटे, संजय कांबळे, रचना सहायक अविनाश बन्ने, अभियंता बाबासो भोरे, पिनाका कन्सल्टन्सीचे प्रतिनिधी यांच्यासह लाभार्थी सफाई कर्मचारी उपस्थित होते.