भागातील रस्ता कामाची पाहणी करत असताना शिवीगाळ करत अंगावर धावून आल्याप्रकरणी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी सामजिक कार्यकर्ते संतोष कांदेकर यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आण्णा रामगोंडा शाळा परिसरातील नारळ चौक भागात आमदार फंडातून रस्त्याचे काम सुरु आहे.
संतोष कांदेकर हे मंगळवार ता. १५ रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास कामाची पाहणी करण्यासाठी त्याठिकाणी गेले होते. त्यावेळी प्रकाश मोरबाळे यांनी कांदेकर यास तू इथे का आलास असे म्हणत शिवीगाळ करुन मारण्यास अंगावर धावून गेले. यावरून संतोष कांदेकर यांनी प्रकाश मोरबाळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.