आयपीएल 2025 स्पर्धेतील साखळी फेरीचा पहिला टप्पा संपला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्लेऑफची शर्यत चुरशीची झाली आहे. पण तीन संघांची सध्याची स्थिती पाहता क्वॉलिफाय होणं कठीण दिसत आहे.
राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचं स्पर्धेतील आव्हान खूपच कठीण झालं आहे. प्लेऑफमध्ये जागा मिळवायची असेल तर उर्वरित सर्वच सामने जिंकावे लागतील. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा पाय तर खोलात आहे.
आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं तर 16 गुण हे असणं भाग आहे. पण स्पर्धेतील चुरस वाढली तर हे गणित फार फार तर 14 गुण आणि नेट रनरेटवर येऊन ठेपेल. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सला उर्वरित सर्वच सामने जिंकावे लागतील. 25 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात एका संघाचा फैसला होईल.
मुंबई इंडियन्सने सलग तीन सामने जिंकले असून स्पर्धेत असल्याचं दाखवून दिलं आहे. मुंबई इंडियन्सला उर्वरित सहा पैकी 4 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. कारण मुंबईचे आता 8 गुण आहेत. चार सामने जिंकले तर 16 गुण होतील.
कोलकाता नाईट रायडर्सलाही तशीच संधी आहे. पण उर्वरित 6 पैकी पाच सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. आता कोलकात्याच्या खात्यात 6 गुण आहेत. पाच सामन्यात विजय मिळवला तर 16 गुण होतील.