Friday, June 27, 2025
Homeइचलकरंजीसव्वा कोटीच्या फसवणूक प्रकरणी मयूर व पंकज अग्रवालला पोलीस कोठडी

सव्वा कोटीच्या फसवणूक प्रकरणी मयूर व पंकज अग्रवालला पोलीस कोठडी

विश्वास संपादन करून मागणीनुसार सुतपुरवण्याचे सांगत व्यापाऱ्याची १ कोटी २१ लाख ४४ हजार ३७० रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी अटक केलेल्या मयुर पंकज अग्रवाल आणि प्रविण पुष्पक अग्रवाल ( दोघे रा. कागवाडे मळा) या दोघांना न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, सदर फसवणुक प्रकरणी अग्रवाल कुटुंबातील ७ जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हे सर्वजण एकमेकांच्या बँक खात्यावर पैशाचे व्यवहार दाखवून विविध बँकांकडून फसवणूकप्रकरणी मयूर व पंकज अग्रवाल यांना न्यायालयात हजर

करण्यासाठी घेऊन जाताना कोट्यवधीचे कर्ज उचलून फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच कुटुंबातील मुला-मुलींच्या नावे विविध फर्म काढण्यात आल्याचेही तपासात उघड झाल्याचे पोलिस निरिक्षक सचिन मयूर चिंदे पाटील यांनी सांगितले. हुलगेश्वर रोड येथे राहणारे मनिषकुमार धुत यांचे क्रिशव फॅबटेक नामक सुत खरेदी-विक्रीचे कार्यालय आहे. कागवाडे मळ्यात राहणारे अग्रवाल कुटुंबियांनी मयुर इंडस्ट्रिजच्या नावे संगनमत करून

धुत यांना १ कोटी २१ लाख ४४ हजार ३७० रुपयांचे सुत विक्री केले. त्यापोटी धुत यांनी अग्रवाल कुटुंबियांना रक्कमही दिली. मात्र प्रत्यक्षात धुत यांना सुत मिळाले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही सुत अथवा रकमही परत न मिळाल्याने धुत यांच्या फिर्यादीनुसार ७ जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यापैकी पंकज आणि पियुष अग्रवाल या दोघांना यापूर्वीच अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर मयुर पंकज अग्रवाल आणि प्रविण पुष्पक अग्रवाल या दोघांना पुण्यातून अटक केली आहे. वर्षा सवाल आणि विशाल अग्रवाल यांचा पोलीस शोध घेत असल्याचे पो. नि. पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -