Friday, June 27, 2025
Homeमहाराष्ट्रआई आहे का कैदाशीन? पोटच्या पोराला लाथेने तुडवलं, डोकं पकडलं अन्… थरकाप...

आई आहे का कैदाशीन? पोटच्या पोराला लाथेने तुडवलं, डोकं पकडलं अन्… थरकाप उडवणारा

खरं तर, आई(mother) म्हणजे मायेचा अथांग सागर. आपल्या मुलासाठी ती कोणत्या संकटाला सामोरी जाऊ शकते. मुलगा दुखावला गेला तर तिच्या काळजाचं पाणी पाणी होतं. आईचं प्रेम हे नि:स्वार्थ, निर्मळ आणि अढळ मानलं जातं. पण जर हीच आई आपल्या पोटच्या मुलावर उठली, त्याच्यावर क्रूरपणे अत्याचार करू लागली, तर तो प्रसंग किती भयावह असेल, याची कल्पनाही अंगावर शहारा आणणारी आहे.

 

सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यातील दृश्ये तुम्हाला हैराण करतील. या व्हिडीओमध्ये एक आई(mother) आपल्या मुलाला अमानुषपणे मारताना दिसून आली. महिला चिमुकल्याला अक्षरशः बेदम मारहाण करते. ती केस धरून त्याला फरफटत नेते, त्याच्या चेहऱ्यावर आणि अंगावर सटासट थप्पडांचा आणि मुक्क्यांचा मारा करते.

 

 

इतकंच नव्हे, तर जमिनीवर पडलेल्या त्या निरागस मुलाला ती लाथांनी तुडवते. आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरील अश्रूही तिला यावेळी दिसत नाहीत. हा संपूर्ण प्रकार तिथल्या शेजाऱ्याने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जो पाहून आता सर्वांच्या काळजात धस्स झाले आहे.

 

 

या धक्कादायक घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि बाल कल्याण विभागही जागे झाले आहेत. जिल्हा बाल कल्याण अधिकारी बोनागिरी नरेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे नाव रमा असून ती सध्या मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्यांशी झुंज देते आहे. तिच्यावर समुपदेशन सुरू करण्यात आले आहे.

 

 

याआधी ती आपल्या पहिल्या पतीपासून विभक्त झाली होती आणि नंतर दुबईमध्ये नोकरी करणाऱ्या अंजनेयुलु नावाच्या दुसऱ्या व्यक्तीशी तिने लग्न केलं. तिच्या अशा वागणुकीमागे कौटुंबिक संघर्ष, मानसिक तणाव आणि अस्थिरता कारणीभूत असल्याचं सांगण्यात येतं. त्या मुलाची सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य लक्षात घेता, त्याला तात्पुरत्या स्वरूपात त्याच्या आजी-आजोबांकडे सुपूर्त करण्यात आले आहे.

 

या घटनेचा व्हिडिओ @boddeti.raju नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “चौकात ऊभा करुन मारलाय पायजेल बाई ला या” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या बाईला जेल द्या”.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -