Homeमहाराष्ट्रनोकरी मिळत नसल्याच्या नैराश्‍यातून तरुणाने दोरीने गळफास घेऊन संपवले जीवन; अनेक ठिकाणी...

नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्‍यातून तरुणाने दोरीने गळफास घेऊन संपवले जीवन; अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या, पण..

नोकरी (Job) मिळत नसल्याच्या नैराश्‍यातून कणेरीवाडी (ता. करवीर) येथे तरुणाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. राकेश शंकर वाळके (वय २२) असे मृताचे नाव आहे.

 

त्याने घरीच गळफास घेतल्याची माहिती सायंकाळी नातेवाइकांना मिळाली.त्याला तातडीने ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. नोकरी मिळत नसल्यामुळे तो गेली काही दिवस निराश होता.

 

अनेक ठिकाणी तो मुलाखती देत होता. मात्र, त्याची निवड होत नव्हती. त्याचे शिक्षण बारावी झाले असून, नोकरी मिळण्यात यश न आल्याच्या नैराश्‍यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. घटनेची नोंद ‘सीपीआर’ पोलिस (CPR Police) चौकीत झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -