Friday, May 9, 2025
Homeकोल्हापूरपुलाची शिरोली येथे टँकरच्या धडकेत टेम्पो चालक ठार

पुलाची शिरोली येथे टँकरच्या धडकेत टेम्पो चालक ठार

कोल्हापूर सांगली राज्य मार्गावर जंगदब टाईल्स समोर टँकरची मालवाहू टेम्पोस धडक दिल्याने बत्तीस शिराळा तालुक्यातील टेम्पो चालक ठार झाला. हा अपघात सांगली फाटा मार्बल लाईन येथे घडला .

 

मिळालेली अधिक माहिती अशी की, कोल्हापूर-सांगली राज्य मार्गावर जंगदब टाईल्स येथे अरूण शिवाजी पाटील ( रा. बिऊर ता. बत्तीस शिराळा जि. सांगली ) हे टाईल्स खरेदी करण्यासाठी दुपारी आले होते. टाईल्स खरेदी करून आपल्या मालवाहू टेम्पोने रस्ता ओलांडून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना सांगलीकडे जाणाऱ्या टँकरने जोराची धडक दिल्याने टाईल्स भरलेला टेम्पो पलटी होऊन टेम्पो खाली अरूण पाटील हे अडकल्याने ते गंभीर जखमी झाले.

 

उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात आज बुधवारी ४:३० वाजण्याच्या सुमारास झाला असून या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिसात झाली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -