Friday, January 16, 2026
Homeसांगलीkolhapur : विजेचा धक्का बसून कंत्राटी वायरमनचा मृत्यू

kolhapur : विजेचा धक्का बसून कंत्राटी वायरमनचा मृत्यू

खेबवडे (ता. करवीर) येथे ग्राहकाच्या तक्रारीनुसार वीज दुरुस्ती करत असताना विजेचा धक्का लागून निगवे खालसा (ता. करवीर) येथील कंत्राटी वायरमनचा मृत्यू झाला. राहुल मारुती कांजर (वय 30) असे त्यांचे नाव आहे.

 

शनिवारी सकाळी 10 वाजता ही घटना घडली.

 

राहुल हा ‘महावितरण’कडे गेली 7 वर्षे बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी होता. सद्या तो वडकशिवाले उपकेंद्रांतर्गत खेबवडे येथे सेवा बजावत होता. माळवाडी येथील ट्रान्स्फॉर्मजवळ तो गेला होता. त्यावेळी लाईनमधील एबी स्वीच उघडत असताना त्याला विजेचा जोरात धक्का बसला व तो जमिनीवर पडला. बेशुद्ध अवस्थेत त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. सीपीआर पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

 

नातेवाईकांचा आक्रोश

 

राहुलचे दोन वर्षांपूर्वी बाचणी (ता. कागल) येथील जयसिंग लाड यांच्या मुलीशी विवाह झाला होता. त्याला एक महिन्याची मुलगी आहे. राहुलच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक, मित्रांनी घटनास्थळी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. त्याच्या मागे पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -