Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रखांबावर काम करताना अचानक विद्युत प्रवाह सुरु; कंत्राटी कामगाराचा मृत्यू

खांबावर काम करताना अचानक विद्युत प्रवाह सुरु; कंत्राटी कामगाराचा मृत्यू

महावितरणकडून सध्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. अशाच प्रकारे दुरुस्तीचे काम करण्यासाठी कंत्राटी कामगार विद्युत पोलवर चढला होता. मात्र काम करत असताना बंद करण्यात आलेल्या विद्युत प्रवाह अचानक कोणीतरी सुरु केल्याने कामगाराला विजेचा जोरदार धक्का बसला.

 

यात या कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

 

मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा या गावात सदरची घटना घडली आहे. यात महावितरणचा कंत्राटी कामगार असलेला टाकळी येथील नीतेश अशोक पाखरे (वय २२) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. नीतेश पाखरे याचे आयटीआयचे शिक्षण झाल्यानंतर मागील दीड महिन्यापासून अग्रवाल कंपनीच्या ठेकेदाराच्या माध्यमातून महावितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होता. दुरुस्तीचे काम करण्यासाठी हा महावितरण कर्मचाऱ्यांसोबत जात होता.

 

विजेचा झटका बसताच खांबावरून कोसळला

 

दरम्यान ११ मे रोजी रुईखेडा गावात दुरीस्तीचे काम करण्यासाठी नीतेश हा वीजखांबावर चढला होता. काम करण्यापूर्वी परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र नितेश काम करीत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाला. यात त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो खांबावरून खाली कोसळला. यात जबर मार लागला होता. त्याला तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

 

ग्रामस्थ संतप्त

 

दरम्यान घटना घडल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले होते. तर महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप नातेवाइकांकडून होत आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. या प्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -