Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रधान्य घेऊन निघालेल्या ट्रकची काळ्या-पिवळ्या टमटमला धडक; 3 ठार 14 प्रवासी जखमी

धान्य घेऊन निघालेल्या ट्रकची काळ्या-पिवळ्या टमटमला धडक; 3 ठार 14 प्रवासी जखमी

शहरातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी टाटा मॅजिक वाहनाला ट्रकची धडक बसल्याने भीषण अपघाताची (Accident) घटना घडली. या अपघातात टाटा मॅजिकच्या ड्रायव्हरसह 3 जणांचा मृत्यू झाला असून 14 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती कळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चंद्रपूर (Chandrapur) प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली.

 

चंद्रपूर जिल्ह्याच्या मुल तालुक्यातल्या चितेगाव येथील ही दुर्दैवी घटना असून सिंदेवाही येथू प्रवाशी घेऊन हे मॅजिक वाहन मुलकडे निघाले होते. त्यावेळी, चितेगावजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने ह्या प्रवासी वाहनाला धडक दिली. त्यामध्ये, निर्दोष मोहूर्ले (ड्रायव्हर), मनाबाई सिडाम (65) आणि एक प्रवाशी असा एकूण तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शासकीय धान्य घेऊन हा ट्रक निघाला असता, मॅजिक वाहन आणि ट्रकची समोरासमोर धडक बसली. दरम्यान, अपघातातील जखमींना मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून मुल पोलीस अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -