ऊस शेती व्यवस्थापन करताना उगवण, फुटवे, कांडी सुटणे आणि जोमदार वाढ या वाढीच्या प्रमुख अवस्था आहेत. नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची मात्रा वाढीच्या अवस्थेनुसार चार वेळा विभागून द्यावी. मातीचे परीक्षण करून खतमात्रा देणे पीक वाढीसाठी फायदेशीर ठरते.
ऊस पिकासाठी शिफारशीप्रमाणे एकरी ८ ते १० टन शेणखत किंवा कंपोस्टचा वापर करावा. शेणखत किंवा कंपोस्ट(compost) उपलब्ध होत नसल्यास ऊस लागणी अगोदर ताग किंवा धैंचासारखी हिरवळीची पिके घेऊन जमिनीत गाडावीत.
याशिवाय कारखान्यातील मळीपासून तयार केलेले बायोअर्थ कंपोस्ट, गांडूळ खत, कोंबडी खत, मासळी खत, हाडाचा चुरा, गळीत धान्याच्या पेंडी, तसेच खोडव्यात पाचटाचे आच्छादन याद्वारे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविता येते.
ऊस पिकासाठी खताची योग्य निवड, योग्य मात्रा, योग्य वेळ, खत देण्याची योग्य पद्धत महत्त्वाची आहे. यामुळे पिकाच्या गरजेनुसार अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
ऊस शेती व्यवस्थापन करताना रासायनिक खतमात्रा
शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध खतातील अन्नद्रव्यांचे प्रमाण आणि प्रत्यक्ष पिकाला द्यावयाची मात्रा लक्षात घेऊन खतांचा वापर करावा.
मल्टिमॅक्रोन्युट्रियंट आणि मल्टिमायक्रोन्युट्रियंट द्रवरूप खतांची फवारणी ऊस उत्पादनवाढीत सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा प्रमुख वाटा आहे.
ऊस लागवडीत खताची गुणवत्ता, त्याचा योग्य वेळी योग्य पद्धतीद्वारा वापर म्हणजे खत व्यवस्थापन होय.
रासायनिक खतांची गुणवत्ता पाहताना त्या खतांमधून ऊस वाढीसाठी मिळणाऱ्या पोषक अन्नद्रव्यांची कार्यक्षमता लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
खते व्यवस्थापन हे सेंद्रिय आणि जीवाणू खाते या पद्धतीतून करू शकतो
ऊस व्यवस्थापनामध्ये भौतिक, रासायनिक व जैविक सुपीकता टिकवून ठेवणेसाठी सेंद्रिय, जैविक व रासायनिक खतांचा संतुलित वापर करणे गरजेचे आहे.
जमीन सुधारणेचे दृष्टीने खालील सेंद्रिय खतांचा वापर भू-सुधारक म्हणून गरजेचे आहे. ताग व धैचा ही हिरवळीची खते आहेत. ही खते ऊस लागवडीपूर्वी अथवा ऊस लागवडीनंतर वापरता येतात.