Thursday, February 12, 2026
Homeइचलकरंजीमद्यप्राशन करून वाहन चालवल्या प्रकरणी एकास १० हजाराचा दंड

मद्यप्राशन करून वाहन चालवल्या प्रकरणी एकास १० हजाराचा दंड

दारु पिऊन मोटरसायकल चालविल्याबद्दल दोषी ठरवत येथील न्यायालयाने उदय तानाजी कारंडे (रा. इचलकरंजी) यास १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

६ मे २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास गांधी पुतळा ते जिल्हा न्यायालय या रस्त्यावर उदय कारंडे हा आपल्या ताब्यातील मोटरसायकल घेऊन रस्त्याच्या परिस्थितीकडे न

पाहता बेडेवाकडेपणे जात होता. त्यावेळी पोलिस कॉन्स्टेबल जयसिंग बागडे यांनी त्याला थांबवून ब्रेथ अनोलायझर मशीन मोफत तपासणी केली असता, कारंडे याने अल्कोहोलचे सेवन केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याला

ताब्यात घेऊन बागडे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणाची सुनावणी फौजदारी न्यायालयात होऊन त्यामध्ये कारंडे हा दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे न्यायालयाने त्याला १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षार्ते अँड. सूर्यकांत मिरजे यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -