Friday, August 1, 2025
Homeक्रीडाआयपीएल 2025 स्पर्धेत नव्या शत्रूची एन्ट्री, या संघाला बसणार मोठा फटका; कसं...

आयपीएल 2025 स्पर्धेत नव्या शत्रूची एन्ट्री, या संघाला बसणार मोठा फटका; कसं काय ते जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी तीन संघांचा प्लेऑफच्या शर्यतीतून पत्ता कट झाला आहे. चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट झाले आहेत. अजूनही उर्वरित सात संघात प्लेऑफची चुरस आहे. त्यामुळे 17 मे रोजी होणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. या दोन्ही संघांना या सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. पण या सामन्यात एक विचित्र उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही संघांना मोठा फटका बसू शकतो. एका संघाचं तर प्लेऑफचं स्वप्न यामुळे भंगणार आहे. नेमकं काय होणार आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं उत्तर असं आहे की, 17 मे रोजी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या सामन्यावेळी 65 टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. जर सामन्यावेळी पाऊस पडला तर दोन्ही संघांना मोठा फटका बसू शकतो.

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं गणित

पावसामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स हा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. यामुळे आरसीबीचं गणित ताणलं जाईल. कारण 17 गुण झाले तर प्लेऑफमधील स्थान काही पक्कं होणार आहे. त्यामुळे उर्वरित दोन पैकी एक सामना जिंकणं भाग पडेल. असं केल्यास टॉप 2 मधील स्थान पक्कं होईल. आरसीबी सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर गुजरातचा संघ पहिल्या स्थानावर आहे.

 

कोलकाता नाईट रायडर्सचं गणित

पावसामुळे सामना रद्द झाला तर कोलकात्याच्या प्लेऑफच्या आशा मावळतील. कारण कोलकात्याने 12 सामन्यापैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे एक गुण मिळला होता. कोलकात्याचे 11 गुण असून गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे टॉप 4 मध्ये स्थान मिळवायचं तर उर्वरित दोन्ही सामने जिंकणं भाग आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द झाला तर एक गुण मिळेल आणि 12 गुण होतील. शेवटचा सामना जिंकला तरी 14 गुण होतील त्यामुळे स्पर्धेतील आशा संपुष्टात येतील. कारण टॉप 3 संघांचे गुण 15 पेक्षा जास्त आहे. मुंबई इंडियन्सचे 14 गुण आहेत आणि नेट रनरेट चांगला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -