काश्मीर पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून भारतीय सैन्याने जशास तसे उत्तर देत पाकचे मनसुबे धुळीस मिळवले. भारतीय जवानांचे देशाप्रति असणारे योगदान अतुलनिय आहे. म्हणूनच जवानांचे मनोबल वाढविणे हे आपले कर्तव्य असून यासाठीच शनिवार 17 मे रोजी दुपारी 5 वाजता “तिरंगा एकता रॅली” चे आयोजन केले आहे.
पहेलगाम हल्ल्यामुळे समस्त भारतीयांच्या मनात पाकीस्तानविषयी प्रचंड चिड निर्माण झाली आहे. या दहशतवादी हल्ल्याला भारतीय जवानांनी जशास तसे उत्तर पाकीस्तानचे कुटील डाव हाणून पाडत आहेत. भारतीय जवानांचे देशाप्रति असणारे योगदान अतुलनिय आहे. जवानांचे मनोबल वाढविणेसाठी ” तिरंगा एकता रॅली”चे आयोजन केले आहे. या माध्यमातून भारतीय जवानांना हजारोच्या संख्येने सामुहिक सलामी देण्यात येणार आहे. या देशभक्तीपर अभियानात समस्त इचलकरंजी शहर व परिसरातील सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.