झोमॅटो आणि स्विगी या प्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपन्यांनी त्यांच्या लॉयल्टी प्रोग्राममधून ग्राहकांसाठी असलेला एक महत्त्वाचा लाभ कमी केला आहे, ज्यामुळे पावसाळ्यात ग्राहकांना फूड डिलिव्हरीवर वाढीव अधिभाराचा फटका सहन करावा लागणार आहे.अलिकडेपर्यंत, झोमॅटो गोल्ड आणि स्विगी वन या दोन्ही प्लॅटफॉर्मद्वारे ऑफर दिलेल्या प्रीमियम सबस्क्रिप्शन सर्व्हीसमध्ये नोंदणी केलेल्यांना हवामानाशी संबंधित वाढीदरम्यान अतिरिक्त शुल्क भरण्यापासून सूट दिली होती.आता हा लाभ बंद केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.
पावसाळा सुरु होणार आहे. या तोंडावर आता फूड डिलीव्हरी जाएंट म्हटल्या जाणाऱ्या झोमॅटो गोल्ड आणि स्विगी वन या दोन्ही प्लॅटफॉर्मवरुन दिलेली ऑफर मागे घेण्यात आली होती. ती आता मागे घेतली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या दोन सेवाचे सबस्क्रिप्शन घेतलेल्या युजरना पावसात डिलिव्हरी करायचे सेपरेट चार्जेस भरावे लागणार आहेत.
डिलिव्हरी ऑपरेशन्सवर परिणामाचे शुल्क
नवीन धोरण बदलामुळे पावसासारख्या प्रतिकूल हवामानात डिलिव्हरी ऑपरेशन्सवर परिणाम झाल्यास झोमॅटो गोल्ड आणि स्विगी वन या सेवांच्या सदस्यांसारखेच आता गैर-सदस्यांकडून डिलिव्हरी अधिभार आकारले जातील. या अपडेटमुळे प्रीमीयम सेवांचा आनंद घेण्यासाठी जादा शुल्क भरणाऱ्या ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, परंतु आता त्यांना आता पावसाळ्यात हे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.
तोटा वाढला
झोमॅटो आणि स्विगी या दोन्ही प्लॅटफॉर्मना महसूल आणि नफा वाढवण्यासाठी वाढत्या दबावाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा बदल करण्यात आला असावा असे म्हटले जात आहे. झोमॅटोने आता इटरनल म्हणून पुनर्ब्रँडींग केले गेले आहे, या कंपनीने अलीकडेच करपश्चात नफ्यात ७८% घट नोंदवली आहे, जी आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीत १७५ कोटी रुपयांवरून ३९ कोटी रुपयांवर घसरला आहे. तिचा तिसरा तिमाही नफा ५९ कोटी रुपयांवर आला होता.
स्विगीचे तर आर्थिक चित्र अधिकच गंभीर आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीत १,०८१ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीतील तोट्यापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे,तेव्हा तोटा ५५५ कोटी रुपये होता.