Tuesday, July 8, 2025
Homeइचलकरंजीहालसिध्दनाथ महाराजांच्या भंडार सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

हालसिध्दनाथ महाराजांच्या भंडार सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

गावभाग अनुवाई कन्या शाळेच्या मागे रविवारी १८ मे रोजी सालाबादप्रमाणे कै. भालचंद्र (आण्णा) पुजारी यांच्या वारसाने हालसिध्दनाथ महाराज यांचा भंडार सोहळा आयोजित केला आहे. भंडार सोहळ्यानिमित्तहालसिध्दनाथ महाराज यांची उद्या

शनिवारी १७ रोजी सांयकाळी ६ वाजता पालखी गावभाग येथे येणार आहे. त्यानंतर आरती, रात्री ८ वा. प्रसाद, रात्री १० वाजता धनगर ओवी कार्यक्रम होणार

आहे. रविवारी सकाळी ७ वा. ‘श्री’ ची आरती, ११ वाजता भंडार सोहळा वाघापूरचा फरांडेबाबा यांची १२ वाजता भाकणूक व त्यांनंतर हालसिध्दनाथ महाराज यांची महाआरतीनंतर दुपारी १ ते ३ या दरम्यान अनुबाई कन्या शाळेमध्ये महाप्रसाद वाटप होणार आहे. सांयकाळी ४ वाजता मनिष आपटे व गुरु कुलकर्णी यांचे भजन होणार आहे. सांयकाळी ८ वाजता आरती होवून प्रसाद व धनगर ओवी होतील. दुसऱ्या दिवशी पहाटे पालखी रवाना होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संजय पुजारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -