Tuesday, July 1, 2025
Homeनोकरीगुड न्यूज ... गुजरातमध्ये सरकारी नोकरीची संधी

गुड न्यूज … गुजरातमध्ये सरकारी नोकरीची संधी

गुजरातमधील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुजरात पंचायत सेवा निवड मंडळाने (GPSSB) सिव्हिल ड्राफ्ट्समन पदासाठी थेट भरतीची अधिसूचना जारी केली असून, एकूण २४५ पदांवर भरती केली जाणार आहे.

 

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट gpssb.gujarat.gov.in वर जाऊन ९ जून २०२५ पर्यंत अर्ज करावा.

 

पात्रता काय असावी?

 

या भरतीसाठी GPSSB Recruitment अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सिव्हिल ड्राफ्ट्समनचा दोन वर्षांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय १८ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार वयाची सवलत दिली जाणार आहे.

 

पगार किती मिळणार?

 

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १९,९०० रुपये ते ६३,२०० रुपयांपर्यंतचा पगार मिळणार आहे.

 

अर्ज शुल्क किती आहे?

 

सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासाठी १०० रुपये शुल्क भरावे लागेल. मात्र, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), SEBC, दिव्यांग (PWD) आणि माजी सैनिकांसाठी अर्ज विनामूल्य आहे.

 

निवड प्रक्रिया कशी असेल?

 

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल. परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.

 

अर्ज कसा करावा?

 

1. gpssb.gujarat.gov.in या वेबसाइटला भेट द्या.2. “ऑनलाइन अर्ज करा” या लिंकवर क्लिक करा.3. आवश्यक माहिती भरून लॉगिन क्रेडेन्शियल्स तयार करा.4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.5. अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.6. फॉर्मची प्रिंटआउट सेव्ह करून ठेवा.अर्जाची अंतिम तारीख: ९ जून २०२५ GPSSB Recruitment अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -