Friday, June 20, 2025
Homeमहाराष्ट्रधक्कादायक...टीव्ही पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीने घेतला गळफास

धक्कादायक…टीव्ही पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीने घेतला गळफास

कोरची तालुक्यातील बोडेना गावात गुरुवारी सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसराला हादरवून सोडले. अवघ्या 10 वर्षाची सोनाली आनंद नरेटी या चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने, टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या किरकोळ वादातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी 8 च्या दरम्यान घडली.

 

सोनाली हिने घरच्या मागील बाजूस असलेल्या पेरूच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. तिची मोठी बहीण संध्या (12 वर्षे) हिच्यासोबत टीव्हीच्या रिमोट वरून वाद झाल्यानंतर रागाच्या भरात तिने हे टोकाचे पाऊस उचलले. “माझ आवडत चॅनल पाहू दिल नाही” ही आत्महत्येची प्राथमिक कारणे समोर आली आहे. सोनाली, संध्या व तिचा भाऊ सौरभ (8 वर्षे) हे तिघेही सध्या गोंदिया जिल्ह्यातील कोकना खोबा गावातील एका खासगी आश्रम शाळेत शिकत होते.

 

gadchiroli news उन्हाळी सुट्टी मुळे ते घरी आले होते. घरी आई मंगला आणि सर्वात लहान भाऊ शिवम राहात होता. घटनेची माहिती मिळताच कोरची पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांनी घटना स्थळी भेट देत पंचनामा केला. मृतदेह कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून डॉ. राहुल राऊत यांनी शवविच्छेदन केले. या प्रकाराने बालकांच्या मानसिकतेविषयी जागरूकतेची गरज अधोरेखित होत आहे. समाजाने अशा दुर्दैवी घटना रोखण्यासाठी संवाद आणि संवेदनशीलतेची भूमिका स्विकारण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -