Friday, January 16, 2026
Homeसांगलीपंचकल्याणमध्ये गंठण चोरणारी महिलांची टोळी जेरबंद, संशयित कोल्हापूर, जयसिंगपूरच्या

पंचकल्याणमध्ये गंठण चोरणारी महिलांची टोळी जेरबंद, संशयित कोल्हापूर, जयसिंगपूरच्या

दुधगाव (ता. मिरज) येथे पंचकल्याण महोत्सवात महिलेचे अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरणारी महिलांची टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. महिला दागिन्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती

 

त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

 

संशयित लक्ष्मी बाळू सकट (वय २४, रा. राजेंद्रनगर, झोपडपट्टी, कोल्हापूर), दीपाली अशोक काळे (वय ४०, रा. संभाजीनगर, जयसिंगपूर), सोनू हरी काळे (वय ३५, रा. वाल्मीकी आवास, सांगली), शारदा बंटीनाथ हातळगे (वय ४, जयसिंगपूर) यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला.

 

दुधगाव (ता. मिरज) येथे दि. ८ मे रोजी पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी बोलवाड (ता. मिरज) येथील शकुंतला शशिकांत पाटील या पूजेसाठी आल्या होत्या. दुपारी साडेबाराच्या सुमारास जेवण विभागात जेवण करून शकुंतला पाटील या हात धुण्यासाठी गेल्या असता गर्दीचा फायदा घेऊन संशयित चोरट्या महिलांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरले.

 

याबाबत पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ग्रामीण ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे पथक चोरट्यांच्या मागावर होते. त्यांना चोरट्या महिलांची टोळी बुधगाव हायस्कूलजवळ दागिन्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून चोरीचे गंठण जप्त केले.

 

ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले, गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, सहायक फौजदार मेघराज रूपनर, अभिजीत पाटील, बंडू पवार, सचिन कोळी, मनोज नीळकंठ, हिंमत शेख, मनीषा कोरे यांच्या पथकाने कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -