Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रविजेचा धक्का लागून दाम्पत्याचा मृत्यू

विजेचा धक्का लागून दाम्पत्याचा मृत्यू

विजेचा धक्का लागून दाम्पत्याचा मृत्यू

 

विजेच्या झटका लागून दापत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना गुरूवारी (दि.३०) सकाळी आठच्या सुमारास नळवाडपाडा येथे घडली. साहेबराव चंदर महाले (वय २९) व राणी साहेबराव महाले (वय २५) अशी मृतांची नावे आहेत

 

याबाबत मिळालेली माहिती अशी, नळवाडपाडा येथील साहेबराव महाले हे वस्तीवर राहतात. गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरु आहे. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास ते छताच्या लोखंडी पाईपला शिकार पंप बांधत होते. यावेळी वीजप्रवाह त्या पाईपमध्ये उतरून त्यांना विजेचा तीव्र झटका लागून ते पाईपला चिकटून बसले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांची पत्नी त्यांना वाचविण्यासाठी गेली असता त्यांनाही विजेचा तीव्र झटका लागला. नातेवाईकांनी विजेचा पुरवठा खंडीत करून त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पावसामुळे घराची पडवी पूर्ण ओली असल्याने ही दुर्दैवी घटना घडली. पती- पत्नीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

 

‘आजी, मम्मी-पप्पा कधी येणार?’

 

दुर्दैवी घटनेनंतर पती- पत्नी दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याची माहिती मिळताच पंचनामा करण्यासाठी तलाठी ग्रामसेवक वीज कर्मचारी घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी आले. यावेळी त्यांची गाडी पाहून चिमुकल्यांना वाटले. त्या गाडीतून मम्मी -पापा आले आहेत. मात्र त्यांना त्या गाडीत दोघेही दिसून न आल्याने मुलांनी मम्मी-पप्पा कधी येणार? त्यांचा निरागस चेहरा पाहून सर्वांनाच गहिवरून आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -