Thursday, July 24, 2025
Homeमहाराष्ट्रसराफा बाजारात चांदीने खाल्ला भाव; एकाच दिवसात 4 हजारांची भरारी, सोन्याची काय...

सराफा बाजारात चांदीने खाल्ला भाव; एकाच दिवसात 4 हजारांची भरारी, सोन्याची काय अपडेट

जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दराने विक्रमी उच्चांकी गाठली आहे. जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल चार हजारांची वाढ झाली आहे.

 

चांदीच्या किंमतींनी पु्न्हा लाखाचा टप्पा ओलांडला आहे. या नवीन घडामोडीमुळे चांदीचे दर जीएसटीसह १ लाख ०८ हजार १५० रुपयांवर पोहोचले आहेत.

 

जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीचे दराने १ लाख ८ हजारांचा आकडा पार केला आहे.

 

दुसरीकडे सोन्याच्या दरात ७०० रुपयांची घसरण होऊन सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ४२५ रुपयांवर खाली आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे

 

रशिया-युक्रेन यांच्या गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या युद्धामुळे सोने-चांदीच्या दरात वाढ व घट होत आहे, असल्याचं सराफ व्यवसायिकांचं म्हणणं आहे

 

युध्दजन्य स्थिती अशीच राहिल्यास महिना अखेरपर्यंत सोन्याचे दर १ लाख १० हजारांपर्यंत तर चांदीचे दर १ लाख २५ हजारांचा टप्पा गाठू शकते, अशी माहिती सराफ व्यवसायिकांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -