Friday, July 25, 2025
Homeमहाराष्ट्ररेल्वेचा मोठा निर्णय…, आता स्‍लीपर कोचमध्ये मिळणार AC सारख्या सुविधा

रेल्वेचा मोठा निर्णय…, आता स्‍लीपर कोचमध्ये मिळणार AC सारख्या सुविधा

भारतीय रेल्वेतून रोज लाखो प्रवाशी प्रवास करत असतात. प्रवाशांना विविध सुविधा देण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जातो. गेल्या काही वर्षांत रेल्वेच्या सेवेत अमूलाग्र बदल झाले आहेत. रेल्वे स्टेशनवर सुविधा वाढल्या आहेत. आता रेल्वेच्या स्लीपर कोच आणि जनरल कोचमध्ये सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. रेल्वेत एसी कोचमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा नॉन एसी कोचमध्येही दिल्या जाणार आहेत.

 

रेल्वेने नवीन सुविधा हँडवॉशसंदर्भात आहे. रेल्वेने लांब पल्ल्याच्या स्लीपर कोच डब्यांमध्ये लिक्विड हँडवॉश लावण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ही सुविधा फक्त एसी डब्यांमध्ये दिली जात होती. आता नॉन एसी आरक्षित कोचमध्ये ऑनबोर्ड हाउसकिपिंग सेवेसोबत लिक्विड सोप देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

भारतीय रेल्वेने स्वच्छतेच्या मापदंडात आणखी सुधारणा करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर ऑन-बोर्ड हाऊसकीपिंग सेवा असलेल्या सर्व नॉन-एसी स्लीपर आरक्षित कोचमध्ये सुविधा दिली जाणार आहे. एसी आरक्षित कोचप्रमाणेच हात धुण्यासाठी लिक्विड सोप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व विभागीय रेल्वेने OBHS ट्रेनमध्ये ही सुविधा सुरु करण्यासाठी पावले उचलण्याचा सल्ला रेल्वे मंडळाने दिला आहे.

 

रेल्वे मंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये लिक्विड हँड वॉश उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रेल्वेच्या एका अभियंत्याने सांगितले की, ओबीएचएस सुविधा असणाऱ्या ट्रेनमध्ये स्लीपर कोचमधील शौचालयात असणाऱ्या वॉश बेसिनजवळ लिक्विड सोप डिस्पेंसर लावण्यात येणार आहे. ट्रेन सुरु होण्यापूर्वी त्यात लिक्विड हँड वॉश भरण्यात येणार आहे. रस्त्यात त्याची तपासणी केली जाणार आहे. लिक्विड सोप संपल्यावर पुन्हा भरण्यात येणार आहे.

 

देशात विविध प्रकारच्या ट्रेन धावतात. त्यात काही प्रीमियम, राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे. या ट्रेनमध्ये अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. त्यात काही सुपरफास्ट आणि मेल एक्सप्रेस ट्रेन आहे. काही पॅसेंजर ट्रेन आहे. सुरपरफास्ट मेल-एक्सप्रेस ट्रेनमध्ये मोजक्या ट्रेनमध्ये ओबीएचएस सुविधा आहे. ट्रेन सुटल्यानंतर काही ट्रेनमध्ये ऑन बोर्ड हाउसकीपिंग सेवा (ओबीएचएस) दिली जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -