Homeमहाराष्ट्रविवाहबाह्य प्रेमसंबंध समजल्याने पतीकडून पत्नीला बांबूने बेदम मारहाण

विवाहबाह्य प्रेमसंबंध समजल्याने पतीकडून पत्नीला बांबूने बेदम मारहाण

अनैतिक प्रेमसंबंध असल्याचे समजल्याने पतीने पत्नीला बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदारवस्ती परिसरात गुरुवारी (ता.12) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

 

फिरोज करीम इनामदार (वय – 40 रा.इनामदार वस्ती लोणी काळभोर ता हवेली जि पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुमतरीन फिरोज इनामदार (वय-३५) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुमतरीन व फिरोज इनामदार हे नात्याने पती-पत्नी असून त्यांना दोन मुले आहे. फिरोज इनामदार यांचे लोणी स्टेशन परिसरात मटणचे दुकान असून यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. फिरोज इनामदार याचे आयेशा नामक महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पत्नी मुमतरीन यांना समजली होती. त्यामुळे मुमतरीन व फिरोज इनामदार यांच्यामध्ये रोज वादविवाद होत होते.

 

दरम्यान, फिरोज इनामदार याचे प्रेयसी आयेशा सोबत असलेल्या प्रेमसंबंधावरून गुरुवारी पुन्हा पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण लागले. ‘हमारे घर में रहने का नहीं, मुझे तलाक दे दे, मुझे तुम्हारे साथ रहना नहीं है’ असे म्हणून फिरोजने पत्नी मुमतरीनला मारहाण करत ढकलून दिले. गुडघ्यावर पडल्यानंतर मुमतरीन यांनी आरडओरडा केला. त्यानंतर फिरोजने पत्नीला बांबूने हातावर व पायावर मारहाण केली.

 

त्यानंतर फिरोजने प्रेयसी आयेशा हिला फोन केला. त्यावेळी तिनेही शिवीगाळ केली. “तुझे घर पे आके बहुत मारूंगी, मैं तुझे छोडनेवाली नहीं” अशी धमकी मुमतरीनला फोनवरून दिली. याप्रकरणी मुमतरीन इनामदार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार फिरोज इनामदारवर भारतीय न्याय सहिता कायदा कलम ११८(१),११५,३५२,३५१,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतन धेंडे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -