Thursday, June 26, 2025
Homeक्रीडा9 संघ, 131 सामने आणि 1 ट्रॉफी, Icc स्पर्धेला 17 जूनपासून सुरुवात,...

9 संघ, 131 सामने आणि 1 ट्रॉफी, Icc स्पर्धेला 17 जूनपासून सुरुवात, टीम इंडिया किती मॅच खेळणार

दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा महाअंतिम सामन्यात पराभव केला आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत मानाची गदा पटकावली. दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांदा विजयी होण्यापासून रोखलं. यासह क्रिकेट विश्वाला नवा विजेता मिळाला. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळीचा शेवट झाला. त्यानंतर आता 17 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीला सुरुवात होत आहे.

 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीत एकूण 9 संघांमध्ये 131 सामने खेळवण्यात येणार आहे. या साखळीतील पहिला सामना श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणार आहे.

 

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात मंगळवार 17 जूनपासून पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना गॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. उभयसंघात एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेचा स्टार आणि अनुभवी ऑलराउंडर अँजलो मॅथ्यूज बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर निवृत्त होणार आहे. अँजलो यासह या साखळीतील निवृत्त होणारा पहिला खेळाडू ठरणार आहे.

 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीत ऑस्ट्रेलिया सर्वाधिक 22 सामने खेळणार आहे. इंग्लंडला 21 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. न्यूझीलंड 16 कसोटी सामने खेळणार आहे. तर बांगलादेश आणि श्रीलंकेचे प्रत्येकी 12-12 सामने होणार आहेत.

 

टीम इंडिया या साखळीत एकूण 18 सामने खेळणार आहे. टीम इंडिया मायदेशात 9 सामने खेळणार आहे. तर विदेशातही टीम इंडियाला तितकेच अर्थात 9 सामने खेळावे लागणार आहेत.

 

तसेच दक्षिण आफ्रिका या साखळीत 14 सामने खेळणार आहे. वेस्ट इंडिजचे 14 सामने होणार आहेत. तर पाकिस्तान 13 सामने खेळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -