Monday, April 22, 2024
Homeसांगलीजीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी रोहन कुरणे (रा. इस्लामपूर) याच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात कुरणेला मदत करणार्‍या त्याच्या दोन मित्रांनाही पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील मुख्य संशयित कुरणे याचा पाेलिस शाेध घेत आहेत. मुस्तफा हुसेन पठाण (वय 23), खालीद मुसा मुल्ला (वय 20, दोघे रा. शिवनगर, इस्लामपूर) अशी अटक करण्‍यात आलेल्‍या संशयित आराेपींंची नावे आहेत.

तीन महिन्यांपूर्वी पीडित मुलगी घरी जात होती. त्यावेळी मुस्तफा याने तिला रस्त्यामध्ये अडविले. तेथे रोहन कुरणे आला. त्याने मुलीच्या घरच्यांना मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. नऊ दिवसांपूर्वी संशयित कुरणे हा दुचाकीवरून पीडित मुलीला व तिच्या मैत्रिणीला घेऊन गेला होता.त्यावेळी त्याने पीडित मुलीवर बलात्कार केला. त्या दिवशी संध्याकाळी त्याने मुलीला तिच्या घरी आणून सोडले. याबद्दल कोणाला काही सांगू नकोस, अशी दमदाटी कुरणे व मुस्तफा पठाण यांनी केली होती. त्यानंतर मुलीच्या वडिलांनाही धमकी दिली. कुरणे व त्याच्या साथीदाराच्या त्रासाला कंटाळून मुलीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर कुरणे फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -