Wednesday, July 23, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा : आयुक्त पल्लवी पाटील

इचलकरंजी : आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा : आयुक्त पल्लवी पाटील

इचलकरंजी महानगरपालिकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण जून महिन्यात वर्धापन मास आयोजित करण्यात आलेला असून या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 

या अनुषंगाने शनिवार दि.२१ जून रोजी जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी महानगरपालिका, आर्ट ऑफ लिव्हिंग इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद, इचलकरंजी, पतंजली योग समिती इचलकरंजी, आय. ॲम.फिट. क्लब आणि रिंगण फिटनेस यांच्या सहकार्याने राजाराम स्टेडियम येथे सकाळी ७ वाजता शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर स्वयंसेवी- सामाजिक संस्था, शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचा सहभागातून योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

तरी या कार्यक्रमासाठी शहरवासीयांनी राजाराम स्टेडियम येथे शनिवार दि.२१ जून रोजी सकाळी ७ वाजता मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -