इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सद्यस्थितीत शहरातील ड्रेनेज लाईन सफाई एकाच जेटिंग मशीन द्वारे करण्यात येत असल्याने ड्रेनेज सफाईच्या कामांमध्ये मर्यादा येत होत्या.
यामुळे आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे मागणीनुसार महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग अंतर्गत नगरपरिषद प्रशासन संचालनालया कडून इचलकरंजी महानगरपालिकेच्या ताफ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले १८.५ टन आणि ७.५ टन क्षमतेचे सक्क्षन अँड जेटिंग मशीन सह वॉटर रिसायकलिंग सिस्टीम (पाण्याचा पुनर्वापर) अशा आणखी दोन्ही वाहनांचे पुजन गुरुवार दि.१९ रोजी रोजी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदु परळकर उपायुक्त अशोक कुंभार उपायुक्त राहुल मर्ढेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
पुजन झाले नंतर लगेचच या मशीनचे काम सुरू करुन या कामाची पाहणी आयुक्त यांनी सर्व अधिकारी यांचे समवेत केली आणि याबाबत आवश्यक त्या सुचना संबंधित विभाग प्रमुख यांना दिल्या.
या मशीनच्या वापरामुळे ड्रेनेज लाईन चोकअप होण्याचे प्रमाण नगन्य राहणार असून ड्रेनेजचे चोकअप काढण्यासाठी या पूर्णपणे मनुष्य विरहित असलेल्या मशिनरीचा वापर इचलकरंजी महानगरपालिके मार्फत करण्यात येणार आहे. या दोन्ही मशीनच्या वापरामुळे महानगर पालिकेची आर्थिक बचत होणार आहे.
यावेळी मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहा.आयुक्त रोशनी गोडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत संगेवार कार्यकारी अभियंता अभियंता अभय शिरोलीकर, शाखा अभियंता बाजी कांबळे, वाहन अधिक्षक प्रशांत आरगे, विद्युत अभियंता इसरार बेग, हर्ष माळगे तसेच या वाहनांचे राज्य स्तरावरील व्यवस्थापन असलेल्या आर्यन कंपनीचे प्रतिनिधी विक्रम गायकवाड, सर्व्हिस इंजिनियर वैभव सूर्यवंशी यांचेसह आरोग्य विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.