Wednesday, June 25, 2025
Homeमहाराष्ट्रसोनम रघुवंशी समलैंगिक, तिला मुलींमध्ये रस… कोणी केला धक्कादायक दावा ?

सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला मुलींमध्ये रस… कोणी केला धक्कादायक दावा ?

इंदौरमधील वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी याच्या निर्घृण हत्येप्रकरणी मेघालय न्यायालयाने गुरुवारी आरोपी पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह या दोघांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली.याशिवाय, आकाश राजपूत, विशाल सिंग चौहान आणि आनंद या तीन अन्य आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याच दरम्यान आता मृत राजा रघुवंशी यांच्या ज्योतिषाने एक अतिशय धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणतात की, सोनमचे समलैंगिक संबंध असू शकतात. जर रघुवंशी कुटुंबीयांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा झाला तर, या ज्योतिषाने यापूर्वी केलेले सर्व दावे देखील खरे ठरले आहेत.

 

मृत राजाच्या कुटुंबियांच्या सांगण्यानुसार, ज्योतिषी अजय दुबे यांनी त्यांच्या कुटुंबाबाबत केलेली बहुतांश भाकितं खरी ठरली आहेत. राजा रघुवंशी हत्याकांडात पंडित अजय दुबे म्हणाले – राजाच्या कुटुंबाने त्यांच्या मुलाची पत्रिका ही सोनमच्या पत्रिकेशी जुळवून पाहिली होती. त्यावेळी त्यांनी राजाच्या कुटुंबियांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली होती, त्यातील उत्तरं बऱ्या प्रमाणात बरोबर ठरली

 

राजाच्या कुटुंबियांचा प्रश्न – राजाची तर हत्या झाली, पण आमची सून सोनम कुठे आहे ?

 

उत्तर – सोनम जिवंत आहे आणि सुरक्षित आहे.

 

राजाच्या कुटुंबियांचा प्रश्न – सोनम जिवंत आहे, तर मग ती कुठे आहे ?

 

उत्तर – ती उत्तर दिशेला आहे.

 

राजाच्या कुटुंबियांचा प्रश्न – या हत्येत कोणाकोणाच सहभाग आहे ?

 

उत्तर – तीन ते चार लोकं आणि महिला

 

राजाच्या कुटुंबियांचा प्रश्न – पण ती महिला कोण आहे ?

 

उत्तर – तुमचीच सून सोनम

 

‘सोनमचे समलैंगिक संबंध’

 

याशिवाय, ज्योतिषी अजय दुबे यांनी असाही दावा केला की, या मर्डर मिस्ट्रीमध्ये आणखी एक महिला सामील आहे. ती दुसरी महिला कोण हे लवकरच उघड होईल, असं ते म्हणाले. ती दुसरी महिला म्हणजे सोनमची मैत्रीणही असू शकते. एवढंच नव्हे तर सोनमचे समलैंगिंक संबंध असू शकतात, तिला मुलींमध्ये रस आहे, असं तिची पत्रिका सांगत्ये, असा दावाही त्यांनी केला.

 

पत्रिकेत होता मृत्यूयोग

 

ज्योतिषी अजय दुबे म्हणाले- सोनमच्या कुटुंबाने राजाच्या कुटुंबाला फसवले आहे. पत्रिकेत मृत्युयोग होता, परंतु सोनमच्या कुटुंबाने राजाच्या कुटुंबाला याबद्दल काहीच माहिती दिली नाही. जर राजाच्या कुटुंबाला मृत्युयोगाची माहिती दिली असती तर काही उपाय करता आले असते आणि ही घटना घडली नसती. सोनमचं गेल्या 2 वर्षांपासून प्रेमप्रकरणसुरू होतं. ती अतिशय हेकेखोर आणि हट्टी मुलगी आहे. तिच्या कुंडलीत राहू योग होता, म्हणून ती तिला जे हवं तेच करायची. तिला जे पाहिजे ते साध्य करण्यासाठी, मिळवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ सकते हे तिची पत्रिका पाहिल्यावर कळतं, असा दावाही त्यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -