शहरात अत्यंत धोकादायक असलेल्या तब्बल 60 इमारती आहेत. तेथे नागरिक डोक्यावर मरण घेऊनच वास्तव्य करत आहेत. सध्या पाऊस आणि वार्याचे थैमान पाहता दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली, तर अनेकांना जीव गमवावा लागणार आहे.
तसेच सर्वच चौक उंच होडिर्र्ंगने व्यापले आहेत. कावळा नाका (ताराराणी चौक) येथील तीन होर्डिंगही धोकादायक बनले आहेत. सिग्लनला अनेक वाहने थांबलेली असतात. एखादे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडल्यास काही जणांचा हकनाक बळी जाणार आहे.
महापालिकेच्या इमारतीही धोकादायक
कोल्हापूर शहरात अनेक धोकादायक इमारती आहेत. विशेष म्हणजे, महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या संभाजीनगर येथील कामगार चाळीतील 5 इमारतींचाही त्यात समावेश आहे. पाच मजल्यांच्या या इमारती 1972 ला बांधण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत त्या इमारतीत तब्बल 97 कुटुंबे वास्तव्य करत आहेत. यात सफाई कर्मचारी आणि झाडू कामगारांचा समावेश आहे. 50 वर्षे उलटून गेल्याने इमारती अत्यंत धोकादायक बनल्या आहेत. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इमारती पाडाव्यात असा रिपोर्ट आहे. जनावरांच्या गोठ्यापेक्षाही वाईट अवस्था त्या इमारतीतील घरांची झाली आहे; मात्र तेथील कर्मचार्यांचे महापालिका प्रशासन योग्य आणि तत्काळ पुनर्वसन करत नसल्याने हा प्रश्न भिजत घोंगड्यासारखा पडला आहे.
चौकाचौकांत होर्डिंग…
शहरात तब्बल 611 होर्डिंग असल्याची नोंद इस्टेट विभागाकडे आहे. रस्त्यापासून सुमारे 100 ते 200 फूट उंचीपर्यंतच्या होर्डिंगचा त्यात समावेश आहे. उंच होर्डिंगनी चौक व्यापले आहेत. अनेक होर्डिंग काही वर्षांपूर्वीची आहेत. त्यामुळे त्यांचे लोखंडी स्ट्रक्चर गंजले आहेत. अनेक होर्डिंगचे लोखंडी अँगल वाकलेले असतात. महापालिकेच्या इस्टेट विभागाने सर्वच होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले आहे. धोकादायक होर्डिंगला नोटिसा बजावल्या आहेत.
कोल्हापुरातील धोकादायक इमारती अशा…
गांधी मैदान विभागीय कार्यालय – 05
छ. शिवाजी मार्केट वि. कार्या. – 40
राजारामपुरी विभागीय कार्या. – 05
ताराराणी मार्केट वि. कार्या. – 10
एकूण धोकादायक इमारती – 60