Tuesday, July 22, 2025
Homeसांगलीनीट अभ्यास करेन, एक संधी द्या; मारू नका! साधनाची हृदय पिळवटणारी विनवणी,...

नीट अभ्यास करेन, एक संधी द्या; मारू नका! साधनाची हृदय पिळवटणारी विनवणी, तरी हैवान थांबला नाही

सांगली जिल्ह्याला हादरवणाऱ्या साधना खून प्रकरणातील (Sadhana Bhosle NEET murder) आरोपी धोंडीराम भोसले याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

 

धोंडीराम याने त्याची मुलगी साधनाची हत्या केली होती. लाकडी खुंट्याने त्याने साधनाला बेदम मारहाण केली होती, ज्यात तिचा मृत्यू झाला होता. NEET सराव परीक्षेत कमी मार्क मिळाले या अत्यंत शुल्लक कारणामुळे धोंडीरामने साधनाचा खून केला.

 

सांगलीतील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात ही घटना घडली होती. साधना ही अत्यंत हुशार मुलगी होती. तिला दहावीमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळाले होते आणि ती डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहात होती. यासाठी ती नीटची तयारी करत होती. नीटच्या सराव परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने साधनाचे वडील आणि सदर प्रकरणातील आरोपी धोंडीराम भोसले हा भडकला होता.(Sangli NEET practice exam murder) धोंडीराम हा शिक्षक असून त्याला सराव परीक्षेत मुलीला कमी मार्क मिळाल्याचे सहन झाले नव्हते. रागाच्या भरात त्याने साधनाला लाकडाच्या खुंट्याने मारायला सुरुवात केली होती.बापाचे हैवानी रुप पाहून साधना घाबरली होती. मला मारू नका, मी पुढच्या वेळी चांगला अभ्यास करेन मला एक संधी द्या; असं म्हणत गयावया केली होती. मात्र निर्दयी बापाला तिच्यावर दया आली नाही. त्याने तिला इतकी मारहाण केली की त्यात तिचा मृत्यू झाला. हा बाप इतका निर्दयी निघाला की मारहाण करून तो झोपला आणि दुसऱ्या दिवशी योग दिनाच्या कार्यक्रमाला (Yoga Day 21 June) हजर राहायचं म्हणून निघून गेला होता. रविवारी साधनाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -