Friday, July 4, 2025
Homeमहाराष्ट्रकुत्र्याला वाचवणं जीवावर बेतलं; प्रसिद्ध कबड्डीपटूचा रेबीजमुळे दुर्दैवी मृत्यू!

कुत्र्याला वाचवणं जीवावर बेतलं; प्रसिद्ध कबड्डीपटूचा रेबीजमुळे दुर्दैवी मृत्यू!

उत्तरप्रदेशातील खुर्ज येथील फराणा गावातील राज्यस्तरीय कबड्डीपटू ब्रिजेश सोलंकीचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूने क्रिडाविश्वावर शोककळा पसरली आहे. ब्रिजेशचा मृत्यू रेबीजमुळे झाल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.

 

ब्रिजेश प्रो कबड्डीत निवडीची तयारी करत होता. ब्रिजेशच्या मृत्यूनंतर त्याच्या भावाने प्रतिक्रिया देत त्याच्या मृत्यू मागचे कारण सांगितले आहे.

 

ब्रिजेशचा चुलत भाऊ शिवमने सांगितले की, मार्च महिन्यात गावातील नाल्यात कुत्र्याचे एक पिल्लू पडले होते. ब्रिजेशने ते बाहेर काढले, त्यानंतर पिल्लाने ब्रिजेशच्या उजव्या हाताच्या बोटाला चावा घेतला. त्यानंतर ब्रिजेशने ती दुखापत साधी समजून त्याकडे दुर्लक्ष केले आणि रेबीजविरोधी लस घेतली नाही.

 

यानंतर, त्याने त्याची कबड्डीची तयारी सुरू ठेवली आणि स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागला. गुरुवारी सकाळी ब्रिजेश उठला तेव्हा त्याचा उजवा हात सुन्न झाला होता आणि त्याला थंडी वाजू लागली होती. कुटुंबाला काही समजण्यापूर्वीच दुपारपर्यंत ब्रिजेशचे संपूर्ण शरीर सुन्न पडले होते.

 

यानंतर ब्रिजेशला अलीगढ जिल्ह्यातील जीवन ज्योती रुग्णालयात नेण्यात आले, तेथून त्याला मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथेही रेबीजची लक्षणे दिसल्यानंतर त्याच्यावर उपचार नाकारण्यात आले. मग त्याला मथुरा येथील एका आयुर्वेदिक औषध केंद्रात नेण्यात आले. तिथे त्याला औषध दिल्यानंतर, ब्रिजेशला काही काळ बरे वाटू लागले. मात्र, यानंतर, जेव्हा त्याची प्रकृती आणखी बिघडली, तेव्हा त्याला दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी लक्षणांवरून रेबीजची पुष्टी केली आणि आता रेबीजवर उपचार करण्यासाठी उशीर झाल्याचं सांगत त्याला औषध दिले तरी त्याला आराम मिळणार नसल्याचं सांगितलं. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ब्रिजेशला कुटुंबाने गावात परत आणले. मात्र, वाटेतच ब्रिजेशचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूंनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -