मध्य हायकोर्टाने बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानला मोठा झटका दिला आहे. भोपाळमध्ये नवाबाच्या खानदानी संपत्ती वादा प्रकरणात हायकोर्टाचा निकाल आला आहे. नवाब हमीदुल्ला खान यांच्या वारसदारांच्या अपिलवर हायकोर्टाचा निर्णय आला आहे. हा निकाल सैफ अली खानच्या बाजूने आलेला नाही.यामुळे या प्रकरणात त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. खानदानी संपत्तीचा हा वाद खूप जुना असून यावर भोपाळच्या स्थानिक न्यायालयाने २५ वर्षांपूर्वी निकाल दिला होता. आता या निकालाला नवाब हमीदुल्ला खान यांच्या वारसाच्या अपिलनंतर रद्द केले आहे. हे प्रकरण भोपाळमधील १५०० कोटी रुपयांच्या संपत्तीशी संबंधित आहे.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने सैफ अली खान ( Saif Ali Khan Bollywood Actor ) याच्या वारसा संपत्ती वादात महत्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाच्या मते आता भोपाळ ट्रायल कोर्टाचा २५ वर्षांचा निकाल रद्द केला आहे. आणि या प्रकरणाची सुनावणी नव्याने घेण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी कोर्टाने एक वर्षांचा कालावधी दिला आहे. म्हणजे लवकराच लवकर अन्य वारसदारांना देखील न्याय मिळावा. ही वडीलोपार्जित संपत्ती नवाबची बडी बेगमची मुलगी साजिदा सुल्तान हीला देण्यात आली होती, जी सैफ अली खान याची पणजी आहे.परंतू अन्य वारसदारांनी मुस्लीम पर्सनल लॉच्या मते संपत्तीच्या वाटणीची मागणी केली आहे आणि निवाडा संपूर्ण पारदर्शकेने करण्याची विनंती केली आहे.
अब्जावधी संपत्तीचे प्रकरण
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्याशी संबंधित वादाचे प्रकरणाचा विचार करता २५ वर्षांपूर्वी बेगम सुरैया, नवाबजादी कमर ताज राबिया सुल्तान,नवाब मेहर ताज साजिता सुल्तान आणि बेगम मेहर ताज नवाब साजिदा याने साल २००० मध्ये हायकोर्टात अपिल दाखल केली होती. हे प्रकरण अब्जावधी संपत्तीचा आहे. ज्यात हजारो एकरची जमीनीसह अहमदाबाद पॅलेसचा देखील सहभाग आहे. हायकोर्टाच्या या निर्णयानंतर कोर्टात सैफच्या कुटुंबियांचे आव्हान येत्या वर्षभर वाढणार आहे. आता स्थानिक कोर्ट नव्याने सुनावणी घेऊन कोणता निकाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.