आठवड्याच्या पहिल्याच ट्रेडिंग दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेंसेक्स 247 अंकांनी घसरून 82,253 वर बंद झाला, तर निफ्टी 68 अंकांनी घसरून 25,082 वर स्थिरावला.
IT क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा दबाव होता, परंतु बँकिंग आणि रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाल्याचे पाहायला मिळाले.
सेंसेक्स आणि निफ्टीची स्थिती
सेंसेक्समधील 30 पैकी 20 शेअर्स घसरले.
इन्फोसिस, एशियन पेंट्स आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स 2 टक्क्यांपर्यंत घसरले.
टायटन, महिंद्रा आणि इतर काही शेअर्समध्ये सौम्य तेजी पाहायला मिळाली.
निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 27 शेअर्स घसरले, 22 वर गेले आणि 1 शेअर स्थिर राहिला.
NSE IT इंडेक्समध्ये सर्वाधिक 1.11 टक्क्यांनी घसरण झाली.
मीडिया, फार्मा, बँकिंग, रिअल्टी, हेल्थकेअर आणि FMCG क्षेत्रात तेजी दिसून आली.
स्मार्टवर्क्स IPO – शेवटचा दिवस
स्मार्टवर्क्स कंपनीचा IPO आज (14 जुलै) संपत आहे. आतापर्यंत हा इश्यू 1.2 पट सबस्क्राइब झाला आहे. 583 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे आणि हे पैसे कंपनीचा विस्तार व कर्जफेडीसाठी वापरण्यात येणार आहेत.
स्मार्टवर्क्स ही देशातील सर्वात मोठी ‘मॅनेज्ड कॅम्पस ऑपरेटर’ आहे. एक कोटी चौरस फूट कमर्शियल स्पेसचे व्यवस्थापन करते. Google, Groww, MakeMyTrip, L&T, Bridgestone, Philips Global यांसारख्या 700 पेक्षा जास्त क्लायंट्स आहेत.
जागतिक बाजारात संमिश्र व्यवहार
जपानचा निक्केई निर्देशांक : 0.28 टक्क्यांनी घसरून 39460 वर
कोरियाचा कोस्पी: 0.83 टक्क्यांनी वाढून 3202 वर
हॉंगकॉंगचा हँगसेंग: 0.26 टक्क्यांनी वाढून 24203 वर
चीनचा शांघाय कंपोजिट: 0.27 टक्क्यांनी वाढून 3520 वर
दरम्यान, 11 जुलै (शुक्रवार) रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. सेंसेक्स 690 अंकांनी घसरून 82,500 वर निफ्टी 205 अंकांनी घसरून 25,150 वर बंद झाला होता.
अमेरिकन बाजारातही 11 जुलै रोजी डाऊ जोन्स: 0.6 टक्के घसरण दिसून आली होती. तर नॅस्डॅक कंपोजिट: 0.22 टक्के घसरण आणि S&P 500: 0.33 टक्के घसरण झाली होती.