कबनूर येथील रवी परीट यांच्या मालकीच्या खोलीत बेकायदेशीरपणे विनापरवाना सुरु असलेल्या जुगार अड्यावर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये तीनपानी जुगार खेळणाऱ्या ९ जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम, मोबाईल व मोटरसायकली व इतर साहित्य असा २ लाख १९ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पा. कॉ. सुनिल बाईत यांनी फिर्याद दिली आहे.
कबनूर येथील परीट गल्ली राहणान्या रवी परीट यांच्या मालकीच्या खोलीत तीनपानी जुगार सुरु असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी तेथे व सुरेश परीट (वय ३१ रा. परीट गल्ली), गजानन तानाजी गोसावी (वय ३८ रा. बागडे गल्ली), सुनिल निवृत्ती पोमण (वय ३५ रा.बागडे गल्ली), बाबासो अशोक आवळे (वय ३५ रा. साठेनगर), भरत शंकर ५५. पाणी टाकीजवळ), दत्तात्रय शिवराम पाटील (वय ३६ रा. अष्टविनायक कॉर्नर), अवधुत पुंडलिक सुतार (वय ४० रा. बागडी गल्ली), श्री मनोज नाना देसाई (वय ५० रा. गंगानगर) व रमेश आप्पासो सुतार (वय ५४ रा. शिवाजी कॉर्नर, कबनूर) हे जुगार खेळताना मिळून आले. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत १० हजार ५४० रुपयांची रोकड ६८ हजार ८०० रुपयांचे मोबाईल व १ लाख ४० हजाराच्या दोन मोटरसायकली असा २ लाख १९ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जम करण्यात आला आहे.